गजानन कोळी उर्फ गजा शेट्टी यांचे निधन
कोळी समाजाचा अभिमान हरपला
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी, वेसाव्याच्या आणि संपूर्ण कोळी समुद्रकिनाऱ्याच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पश्चिम किनाऱ्यावरील प्रसिद्ध इंजिन मेकॅनिक आणि कोळी समाजातील प्रेरणास्त्रोत, गजानन गोमा कोळी उर्फ गजा शेट्टी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्याच्या पार्थिवावर वर्सोवा येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी सामाजिक,राजकीय, क्रीडा ,सांस्कृतिक व कामगार विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंड असा मोठा आणि सुशिक्षित परिवार आहे.
गजानन कोळी उर्फ गजा शेट्टी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील आग्राव कोळीवाड्यात झाला. त्याचे वडील ससून डॉक येथे खलाशी म्हणून होते,म्युनिसिपल शाळेत प्रवेश घेऊन पुढील उच्च शिक्षण पार्ले टिळक घेतले आणि मासळी उतारणीपासून ते इंजिन दुरुस्तीपर्यंत सगळं आत्मसात करत गजा शेट्टी नावारूपाला आले होते.आवाजावरून बिघाड ओळखणारा मेकॅनिक म्हणून गजा शेट्टी हे नाव केवळ वेसाव्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हते . महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, चेन्नई, येथे जिथेही मच्छीमार बोट होत्या, तिथे त्यांचा सल्ला, आयडिया, आणि त्याचं ज्ञान हवंहवंसं वाटायचं. मासेमारी इंजिनिअरिंगच्या युगात गजाचं योगदान अमूल्य होतं.त्याच्याकडे येणाऱ्या तरुणांना त्याने प्रशिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं, आणि शेकडो तरुण मेकॅनिक तयार केले.
गजा शेट्टी याने मेसर्स बॉम्बे बोरिंग वर्क्स यांचे उद्योजक मालक कै. रमेश गौडा आणि कै. तेजस गौडा आणि कुटुंबीय मंगलोर पुतूर असून व उद्योजक दामोदर पिल्लई यांच्याशी कौटुंबिक संबंध जपले होते.
त्याचे दुःखद निधन झाल्याने वर्सोवा कोळीवाडा व कोळी समाज बांधव अलिबाग, आग्राव, मुरुड,कोळीवाडे यांच्या वतीने दुःख व्यक्त करण्यात आले.त्याचे उत्तरकार्य वर्सोवा कोळीवाडा येथे होणार असल्याचे त्याचे मुलगा पंकज कोळी(शेट्टी)यांनी कळविले आहे.