ग्रीन अलिबाग संस्थेमार्फत शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाले वृक्षारोपणाचे धडे

ग्रीन अलिबाग संस्थेमार्फत शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाले वृक्षारोपणाचे धडे

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ग्रीन अलिबाग संस्थेमार्फत दत्त टेकडी कुरूळ येथे रामनाथ,अलिबाग येथील नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करायला शिकवण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व, पाण्याचे महत्व तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्व सांगण्यात आले. सौ. केतकी पाटील, सौं. माधुरी आगडेकर यांनी लहान मुलांना अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. सामाजिक संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे वाटप संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले. भविष्यात असे कार्यक्रम अलिबाग परिसरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचा मानस यावेळी राजेश शिंदे यांनी बोलून दाखविला.यावेळी अलिबाग तालुक्यातील मावळा प्रतिष्ठानचे आकाश राणे यांनी देखील मुलांसमवेत संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढविला.

येणारी नवीन पिढी घडवणं हे आपल्या हातात असतं कारण प्रत्येक मुल हे मोठ्यांच्या सांगण्याचं व त्याहून अधिक वागण्याचं अनुकरण करत असतं. त्यामुळे निसर्गाशी जुळवून घेणं, पर्यावरण समजून घेणं याबदल लहान मुलांना या वयातच समजावून सांगितलं तर भविष्यात अनेकजण पर्यावरणासाठी झटून काम करायला तयार होतील. या विचारांचा आदर्श ठेवूनच ग्रीन अलिबाग संस्था काम करत असून संस्थेतर्फे अनेकजणांना विशेष करून तरुणाईला टीम सोबत जोडले जाण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी
संस्थेमध्ये सामील होण्यासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे
9028427638,95270 26514 देण्यात आलेला असून ग्रीन अलिबाग तालुक्यात वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा एक नवीन विचार रुजवू पाहत आहे.