माथेरान मध्ये ई रिक्षावर झाड पडून अपघात चालकासह प्रवासी जखमी…

माथेरान मध्ये ई रिक्षावर झाड पडून अपघात चालकासह प्रवासी जखमी…

✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो.8793831051

माथेरान :- पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये शासनाच्या वतीने सुरू असलेल्या पायलेट प्रोजेक्ट मधील ई रिक्षा क्र.10 वर नैसर्गिक आपत्ती ओढवली. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील उताराच्या मार्गावर भले मोठे झाड पडून अपघात झाल्याची  घटना घडली असून यात चालकासह तीन प्रवासी ही जखमी झाले आहेत.

 दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरून माथेरानच्या दिशेला येणाऱ्या ई रिक्षावर जांभूळ या जातीचे मोठे सुकलेले झाड मुळासकट ई रिक्षावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली असून या ई रिक्षा मध्ये प्रवास करत असलले तीन प्रवासी तसेच चालक प्रशांत गायकवाड हे जखमी झाले असून  मागून येत असलेल्या रिक्षा मधील प्रवासी सागर जोशी व अब्दुल महापुळे यांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य करत सर्व प्रवाशांना अपघात ग्रस्त ई रीक्षातून बाहेर काढले व ते प्रवास करत असलेल्या रिक्षातून माथेरान नगर परिषदेच्या बि.जे. हॉस्पिटल येथे पाठवले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तीन प्रवाशांना अधिक  उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.ई रिक्षावर झाड कोसळण्याची ही दुसरी वेळ आहे.नैसर्गिक आपत्ती असून सुद्धा वन विभाग व नगरपलिकेकडून दुपारी 3 वाजे पर्यंत पंचनामा केला नसल्यामुळे चालकांचे भाऊ प्रवीण गायकवाड यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी प्रकट केली.

                     ज्या ठिकाणी झाड कोसळले त्या ठिकाणी अर्धा रस्ता जांभा दगडाचा आणि अर्धा रस्ता क्ले-पेव्हर ब्लॉकचा असल्याने चालकाला या चढावरून गाडी काढता आली नाही.जांभा दगडाचा रस्ता अतिशय खराब झाल्याने खड्डे पडले असून गाडी पळवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे असे ई रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.