जिल्हापरिषदेच्या निवडणुका लवकरच होणार ?

जिल्हापरिषदेच्या निवडणुका लवकरच होणार ?

रायगड जि.प.साठी ५९ गट तर पंचायत समितीसाठी ११८ गण

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे याला निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर येणाऱ्या हरकतीचा विचारत करून हि प्रभाग रचना अंतिम करण्यात येईल. रायगड जिल्हा परिषदेचे ५९ गट असून ११८ गण आहेत. पनवेल महानगर पालिका झाल्यामुळे पूर्वी ६२ असलेली गट संख्या ५९ झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ जून २०२५ च्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्यांची प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेनुसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील एकूण लोकसंख्या १७ लाख ९७ हजार ४०१ इटाकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ७३०५९ इतकी असून अनुसूचित जमाती ची २७४९७४ इतकी आहे. त्यानुसार गट आणि गण पडले आहेत
अलिबाग तालुक्याची एकूण लोकसंख्या २ लाख १५ हजार ४२४ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ४६१२ तर अनुसूचित जमातीचे ३४६१२ आहेत. त्यामुळे तालुक्यात ७ गट आणि १४ गण आहेत. मुरुड तालुक्याची एकूण लोकसंख्या६१,९९१ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे १६३९ तर अनुसूचित जमातीचे १२०४३आहेत. त्यामुळे तालुक्यात २ गट आणि ४ गण आहेत. पेण तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ५७ हजार६०२ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे २४०४ तर अनुसूचित जमातीचे ३५४३५आहेत. त्यामुळे तालुक्यात ५ गट आणि १० गण आहेत.पनवेल तालुक्याची एकूण लोकसंख्या २ लाख ४० हजार ३३५ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ११८७६ तर अनुसूचित जमातीचे ३४६१२ आहेत. त्यामुळे तालुक्यात ८ गट आणि १६ गण आहेत.उरण तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख३१ हजार ६८३ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ५१०३ तर अनुसूचित जमातीचे ७०८३ आहेत. त्यामुळे तालुक्यात ४ गट आणि ८ गण आहेत.कर्जत तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ७७ हजार ९९५ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ७१९१ तर अनुसूचित जमातीचे ४९१५५ आहेत. त्यामुळे तालुक्यात ६ गट आणि १२ गण आहेत.खालापूर तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख २९हजार ९०२ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ६११३ तर अनुसूचित जमातीचे २५९८२ आहेत. त्यामुळे तालुक्यात ४ गट आणि ८ गण आहेत.रोहा तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ४६ हजार २६१ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ६३५१ तर अनुसूचित जमातीचे २१६५२ आहेत. त्यामुळे तालुक्यात ४गट आणि ८ गण आहेत.सुधागड तालुक्याची एकूण लोकसंख्या ५१ हजार ८३१ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे २३५२ तर अनुसूचित जमातीचे १६९२७ आहेत. त्यामुळे तालुक्यात २ गट आणि ४ गण आहेत.माणगाव तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ४०हजार ८७३ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ८६४० तर अनुसूचित जमातीचे १२६८७ आहेत. त्यामुळे तालुक्यात ४ गट आणि ८ गण आहेत.तळा तालुक्याची एकूण लोकसंख्या ३३ हजार ६३८ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे २६७३ तर अनुसूचित जमातीचे ४३४३ आहेत. त्यामुळे तालुक्यात २ गट आणि ४ गण आहेत.महाड तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ५२ हजार ६५५ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे ६७५६ तर अनुसूचित जमातीचे ८८७६ आहेत. त्यामुळे तालुक्यात ५ गट आणि १० गण आहेत.पोलादपूर तालुक्याची एकूण लोकसंख्या ३९ हजार ५२० असुन यामध्ये अनुसूचित जातीचे २५१८ तर अनुसूचित जमातीचे २३२९ आहेत. त्यामुळे तालुक्यात २ गट आणि ४ गण आहेत.श्रीवर्धन तालुक्याची एकूण लोकसंख्या ६७ हजार ९०४ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे १९९१ तर अनुसूचित जमातीचे ८३२८ आहेत. त्यामुळे तालुक्यात २ गट आणि ४ गण आहेत.म्हसळा तालुक्याची एकूण लोकसंख्या ४९ हजार ७८७ असुन यामध्ये अनुसूचित जातीचे २८४० तर अनुसूचित जमातीचे ४०५७ आहेत. त्यामुळे तालुक्यात २ गट आणि ४ गण आहेत.
या प्रारूप आदेशाच्या प्रती पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील , जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर,
रायगड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर (पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर) या संदर्भात कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास, ती लेखी स्वरूपात, कारणांसह संबंधित तहसीलदार यांच्याकडे दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.