रांजणखार नवरात्र उत्सव मंडळ च्या वतीने एकविरा येथे स्वच्छता

रांजणखार नवरात्र उत्सव मंडळ च्या वतीने एकविरा येथे स्वच्छता

एकविरा देवस्थान पाच पायरी परिसराची सफाई

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील रांजणखार नवरात्र उत्सव मंडळ च्या सदस्यांनी एकविरा देवस्थान कार्ले वेहेरगाव येथील पाच पायरी परिसराची स्वच्छता केली.देवस्थान ट्रस्ट च्या वत्तीने मंडळाचे कार्याचे कौतुक करण्यात आले.

नववरात्र उत्सव मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच पार पडत असतात. आतापर्यंत मंडळाकडून श्रमदान ,अन्नदान रक्तदान, पूरग्रस्तांना मदत, वृक्षारोपण, मंडप बनवणे, पिण्याच्या पाण्याची पाणी पोई तयार करून देणे, स्थानिक मंदिरांना मदत, शालेय वह्या वाटप अशा प्रकारचे उपक्रम राबवून जनतेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. चालू वर्षी मंडळाकडून एकवीरा देवस्थान कारले वेहेरगाव इथं मातेच्या शक्तीपीठा सभोवतालचा पाच पायरी परिसर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला. मंडळाचे 20 सदस्य श्रमदानासाठी होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोज पाटील, धनंजय पाटील, समीर पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, शंकर पाटील, रमाकांत म्हात्रे, गंगाधर ठाकूर, जीवन म्हात्रे, राजन, सदन, जितू, परेश पाटील,सुनील म्हात्रे यांनी श्रमदानात सक्रिय भाग घेऊन श्रमदानाच्या कार्यक्रम पार पाडला.
या वेळी आम्ही कचरा करायचा आणि तुम्ही उचलायचा अशा प्रतिक्रिया देवस्थान ट्रस्ट कडून आणि भाविकांकडून येत होत्या. दर्शनासाठी येणारी कोळी बांधव, निरनिराळे ग्रुप यांचेकडून मंडळाची चौकशी आणि कामाचे कौतुक केले जात होते. श्रमदान आटोपल्यानंतर ट्रस्टच्या वृत्तीने साईनाथ देवकर एकविरा देवस्थान शक्तिपीठ कमिटीचे व्यवस्थापक यांनी
श्रमदात्यांची विचारपूस करून सर्वांचे अभिनंदन केले. गेली दोन वर्ष श्रमदान करून तुम्ही आम्हाला एक वेगळा आदर्श ठेवला आहे असे म्हणून पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्याचे नियोजन पाटील ट्रेंड्स रांजणखार यांचे कडून करण्यात आले होते. तर अल्पोपहाराची व्यवस्था मित्र पलक ट्रेडिंग पोयनाड आणि प्रधान कंपनी गोंधळ पाडा यांचेकडून करण्यात आली होती.