मुल असे घडते — शिक्षक, पालक, पाल्य आव्हाने कर्तव्य व जबाबदारी.
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- आपल्या पाल्याचे करियर घडताना त्यांनी केवळ प्रमाणपत्र मिळविले की ज्ञान हे पाहणे गरजेचे आहे. कारण आता “”शो स्किल अँड गेट जॉब, गेट प्रमोशन, नो स्किल गेट डिमोशन “”. असा जमाना येण्याची शक्यता नक्कीच आहे.
इतरांपेक्षा वेगळे कौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे. सगळ्या बदकात आपण राजहंस असले पाहिजे. शिक्षक पालकांनी हे असेच झाले पाहिजे, असे तो करेल अशी अविवेकी धारणा न ठेवता मुलावर दोषारोप न ठेवता विवेकी धारणेने त्याच्या प्रयत्नांचे मूल्यमापन करावे, परिणामांचे नव्हे.
जसे भिंग सर्व सूर्यकिरणे एकत्रित करून ज्वालन करते, तसेच सर्व क्षमता एकत्रित करून आपली ज्ञानशक्ती तेवत ठेवली पाहिजे. कारण मूल प्रगती न करता बेशिस्त वागते ते, आपण कोणाचे तरी आहोत असे वाटणे व त्या आपल्या लोकांमध्ये आपले महत्त्वाचे स्थान असणे या गरजा पूर्ण न होणे हे आहे.
सर्व मान्यतेचा अट्टाहास, भविष्याबद्दल दुष्चिंता, परिपूर्णतेचा किंवा यशस्वीतेचा अट्टाहास, हवे ते मिळालेच पाहिजे एकमेव अद्वितीयतेचा अट्टाहास, दुसऱ्यांवर अति अवलंबित व न्यायाचा अट्टाहास, घटनेचे भयंकरीकरण, असहनशीलता व कुचकामीपणा या बाबी टाळल्या पाहिजेत.
विद्यार्थ्यांनी भूतकाळाचा दुष्प्रभाव, बाह्य परिस्थितीवर दोषारोपण करणे, टोकाची अपराधी भावना, कष्ट नकोच, आयते हवे ही गोष्ट टाळावी.
पालक व शिक्षकांनी संवाद, अपडेट राहणे, ऐकणे व बोलणे आणि वाचन याद्वारे पाल्याचे करिअर ठरवावे.
व्यक्तीच्या मनात दिवसभरात वीस हजार विचार येतात. योग्य काय, अयोग्य काय, ही विवेक गोष्ट खुंटते, विचार क्षमता थांबते , बालक मनात किती गुंतागुंत निर्माण होत असेल.
बंद गाडी व घरात धूळ साचते मग बंद मनात किती हलकल्लोळ माजेल.
डोंगरावर नवीन पायवाट निर्माण करण्यासाठी खूप वेळ लागतो, तसेच नवीन ज्ञानाच्या जोडण्या मेंदूत निर्माण होण्यासाठी खूप वेळ उजळणी करावी लागेल.
आपल्याला असं करियर निवडायचे की आपल्या आवडीसाठी लोक आपल्याला पैसे देतील, आपण पैशासाठी नव्हे तर पैसा आपल्यासाठी काम करेल.
मी ठराविकच संबंधितच विद्यार्थ्यांना शिस्त लावेल असे न करता सर्वांना लावावी कारण परागीभवन हा विज्ञानातील प्रकार आपल्याला माहिती आहे.
एक शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारच्या मक्याचे बियाणे पेरतो आणि तो शेजारच्या सर्व शेतकऱ्यांना पण तेच बियाणे वाटतो. जेणेकरून त्यांच्या मक्याच्या धान्यावर बसलेले जीव हे परागीभवन या प्रक्रियेद्वारे त्याच्याही मक्याच्या शेतात येतील आणि जास्तीत जास्त पीक सर्वांबरोबर त्यालाही मिळेल.
म्हणून शिक्षकाने शिस्त लावताना सर्व शाळेला शिस्त लावावी. केवळ स्वतः संबंधित असलेल्या वर्गाला नव्हे. परागीभवन लक्षात ठेवावे.
याला काय टेन्शन आहे असे आपण म्हणतो पण टीन एज मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढे टेन्शन आहे तेवढे दुसऱ्या कोणालाच नाही. ताण वाढला की फ्री फ्रोंटल कोरटॅक्स बंद होऊन चुकीचे निर्णय घेतले जातात आणि सकारात्मक भावना कमी होऊन नकारात्मक भावनांची वाढ होते.
व्यक्ती आनंदी असणार, अनुवंशिकता आणि विचार व वृत्ती आणि परिस्थिती याद्वारे व्यक्तीची बुद्धिमत्ता भावनिकता आणि त्यामुळे करियर ची यशस्वीता ठरते.
मानसिक आजार व मानसिक ताणतणाव आणि मानसिक रुग्ण या बाबी भिन्न आहेत.
नावडत्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याने आत्महत्या घडते.
शारीरिक व मानसिक आरोग्य न बिघडवणे बाल व किशोरवयी सहभागी घटकांना अंगी प्रश्न सोडविण्याचे कौशल्य निर्माण करणे सकारात्मक स्वप्रतिमा, स्वविचार, भावना नियंत्रण कुटुंब व समाज लोकांशी प्रेम व आपुलकीचे नाते आई-वडिलांचे मुलांकडे लक्ष असणं, आर्थिक ताण नसणे, सुरक्षित सामाजिक वातावरण असणे, सामाजिक कामात सहभाग असणं, उत्तम शैक्षणिक वातावरण असणे, एखादं काम समरसून त्यात हरवून जाणे, प्रत्येक काम करताना त्याचा आनंद घेत प्रत्येक क्षणांचा आस्वाद घेणे, आजूबाजूच्याशी संवाद निर्मिती करणे , आयुष्याचे ध्येय अर्थप्राप्ती युक्त ठरविणे, शारीरिक हालचाल, खेळ, व्यायाम करणे, लहान व चांगल्या चांगल्या कृती करणे, लोकांना मदत करणं, इतरांना माफ करणं, कामात स्वायत्तता असणं, उत्तम कौशल्य आत्मसात करणे व स्वतःची प्रगती करण्याची संधी असणे यामुळे नकारात्मक भावना पाहून मुल गडबडून न जाता त्याला तोंड देऊ शकते अशा प्रकारचे विचार आपण पाल्य, पालक, शिक्षक यांनी जबाबदारी पूर्वक करणे गरजेचे आहे.
चारित्र्य निर्मिती, सत्कर्म, नियंत्रण, तानाला सामोरे जाणे हे गुण आत्मसात केले पाहिजे.
ध्येयनिश्चिती करण्यासाठी आपण आपल्या घरात *व्हिजनबोर्डची* निर्मिती केली पाहिजे.
यश, श्रीमंत, आनंद, प्रगती, प्रवास, कुटुंब, ध्येय यशस्वी व्याख्या, चित्र, सुभाषिते, प्रेरक बाबी, वक्तव्य, यशस्वी व्यक्तींची चित्रे, पुढील पाच, दहा,पंधरा वर्षे तुम्ही स्वप्रगती कशी पाहता ते लिहिणे, तशा बातम्यांची कात्रणे मांडणारा, दूरदृष्टी, आपले स्वआयुष्य, करिअर बद्दल दृष्टी मांडणारा बोर्ड म्हणजे *व्हिजनबोर्ड*
याचे *उद्दिष्ट* सतत प्रेरणा मिळते व स्वतःच्या ध्येय विषयी स्पष्टता येते हे होय.
ध्येय *स्मार्ट* असले पाहिजे एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मिजरेबल, ए म्हणजे अचीवेबल, आर म्हणजे रियलॅस्टिक आणि टी म्हणजे टाईम बॉण्ड.
सोप्या शब्दात नेमके ध्येय लिहिणे, ते मोजता येण्यासारखे लिहिणे, साध्य होण्याजोगे लिहिणे,
ते व्यावहारिक असले पाहिजे आणि त्याला वेळेची मर्यादा असली पाहिजे.
असे ध्येय विधान आपल्याला नेमके काय हवे? कधीपर्यंत हवे? त्यासाठी नियोजन करणे, आज मी कुठे आहे याचा विचार करणे आणि ध्येयप्राप्तीसाठी काय करावे याचा विचार करणे आणि स्वतःच्या *क्षमता* आणि *कमतरता* मान्य करणे आणि अपयशातून बाहेर येऊन ध्येयाकडे वाटचाल करत राहणे याशिवाय आपण आपल्या आयुष्यामध्ये एमटी डेड राहिले पाहिजे.
आपल्या मनामध्ये जे जे विचार येतात ते सर्व कुठे ना कुठे व्यक्त केले पाहिजेत म्हणजे आपण मरताना आपल्या डोक्यामध्ये एकही विचार राहता कामा नये.
कारण एमटी डेड न राहण्यामुळे आपल्या भारतातील, जगातील अनेक शास्त्रज्ञांच्या मनातील उत्कृष्ट गोष्टी या जगाला कधीच कळलेल्या नाहीत.
या सर्व बाबींचा विचार करून आपले करिअर उत्कृष्ट घडण्यासाठी पालक पाल्य आणि शिक्षक यांनी विवेकी धारणेवर काम केले पाहिजे अविवेकी धारणा सोडून दिल्या पाहिजेत.
श्रीमान ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी.
संस्कृत अध्यापक तथा करिअर मार्गदर्शक, समुपदेशक.
लेखक २१ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात संस्कृतभाषातज्ञ आणि व्यवसाय मार्गदर्शक व शालेय समुपदेशक करिअर विज्ञ म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरे येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.