जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शिल्लेवाड तर हिमायतनगर तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड – हिमायतनगर दिनांक 13 जुलै 25 रोज रविवारी गोल्ला गोलेवार यादव महासंघाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती, अनेक वर्षापासून हिमायतनगर तालुका अध्यक्ष म्हणून समाजाची धुरा सांभाळत आलेले निष्ठावंत समाजसेवक मा. सुभाषराव शिलेवाड यांची गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर नांदेड जिल्ह्यात ओबीसी चळवळीत सदैव सक्रिय असलेले व ओबीसी आरक्षणासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वात आगोदर हिमायतनगर बाजारपेठ बंद करण्यात आली होती,आसे सिरंजनी येथील यूवा तरूण तडफदार यूवक बाबाराव जरगेवाड यांची हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मा. भूमन्ना आक्केमवाड भोसीकर, प्रदेश उपाध्यक्ष पी.पी. फांजेवाड साहेब,समाज भूषण मारोतराव तोटेवाड, जेष्ठ मार्गदर्शक प्रा.पेंटू सर रुद्रवाड, युवक प्रदेशाध्यक्ष अभिषेकजी बकेवाड,अशोक कासराळीकर,बालाजी शैनेवाड,माधवराव वटपलवाड,परशूराम आक्कमवाड,तुकाराम कैलवाड, रमेश रामपुलवार,शहराध्यक्ष श्यामजी जक्कलवाड,साईनाथ अन्नमवाड,मधूकर मुरगुलवाड, बालाजी मँकलवाड नारायण कोरेवाड व समस्त समाज बांधवांनी या निवडी बद्दल विशेष अभिनंदन केले आहे.