वृषाली सुरेश वेलणकर यांचे दुःखद निधन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
८४२०३२५९९३
अलिबाग:- किहीम ग्रामपंचायतचे माजी सरपंच कै. सुरेश वेलणकर व चोंढी येथील सुप्रसिद्ध हार्डवेअर विक्रेते अक्षय सुरेश वेलणकर यांच्या मातोश्री वृषाली सुरेश विलणकर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी दुःखद निधन झाले. आजारी असल्याने एमजीएम हॉस्पिटल वाशी नवी मुंबई येथे त्यांच्यावरती उपचार चालू असताना शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता यांची प्राणज्योत मावळली. रविवारी त्यांच्या पार्थिवावर चोंढी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजाभाऊ ठाकूर,दिलीप भोईर,तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
राजकारणाच्या पुढे जाऊन पंचक्रोशीची जन्म माणसाची त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे अंत्यविधी प्रसंगी सर्वांच्या अंतरी हळ हळ व्यक्त करण्यात आली.त्याच्या पश्चात मुलगा अक्षय व मुलगी अदिती असा परिवार आहे.