महाराष्ट्राचे लाडके नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर येथे फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्राचे लाडके नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर येथे फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष श्री. वैभव चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे रुग्णांना फळवाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात कमळ जातीच्या बी रोपवाटिका रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आली. रुग्णसेवेच्या दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी बजावत असलेल्या डॉ. पंकज पाटील यांचाही सत्कार या वेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात पोलादपूर तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. राजेंद्र धुमाळ यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपचे श्री. मनोज भागवत, श्री. राजेंद्र धुमाळ, तुकाराम केसरकर, श्री योगेश चव्हाण श्री महेश निकम, किशन प्रताप सिंह श्री अतितोष कदम श्री राजेश सकपाळ श्री विश्वास नलावडे श्री योगेश भोसले श्री निलेश आंबेतकर
मनोज पवार, महिला तालुका अध्यक्ष सौ मंदा झाडाणे कार्यकर्त्या, तसेच तालुक्यातील अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत भाजपा कार्यकर्त्यांनी विधायक कार्याचा आदर्श उभा केला.