अलिबाग मधील समुद्रकिनारी मच्छीमारांची लगबग
1 ऑगस्टपासून होड्या लोटणार?; समुद्राला शांत होण्याची प्रार्थना
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- दोन महिन्यांपासून बंद असलेली मासेमारी सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. मासेमारीचा पहिला हंगाम सुरू होत असल्याने मच्छिमार समुद्राला शांत होण्याची प्रार्थना देवाकडे करीत आहेत. तसेच, समुद्रात होड्या लोटण्यापुर्वी होड्यांची डागडुजीसह अन्य कामे पुर्ण करण्याची लगबग अलिबाग तालुक्यांतील मच्छिमारांची सुरू झाली आहे.
अलिबाग तालुक्यात अलिबाग, आक्षी,आग्राव, वरसोली, थळ,नावगाव, बोडणी,आणि रेवस, मिळुन हजारो हून अधिक मासेमारी नौका चालकांनी दोन महिने शासन आदेशाप्रमाणे पूर्णपणे मच्छिमारी बंद ठेवली आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासुन समुद्रातील हवामान बिघडल्याने वादळाचा सामना करवा लागल्याने कोळीबांधव आर्थिक नुकसानीत आहे. पावसाळ्यात मत्स्य प्रजनन काळ असल्यामुळे दोन महिने खोल समुद्रातील मच्छिमारी बंद असते. त्यामुळे मच्छिमारांना नाहीलाजास्तव किनाऱ्यालगत मिळणाऱ्या जवळा, कोळंबी, बोईट इत्यादी बारीक मासळीवर आपली उपजिविका सुरू ठेवावी लागते. यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याने मच्छिमारीच्या पहिल्या हंगामाला लवकर सुरूवात होत असल्याचे कोळीबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या 1 ऑगस्टपासून होड्या समुद्रात सोडल्या जाणार असल्याची चर्चा असल्याने त्यांची लगबग सुरू आहे. पूर्वतयारी म्हणून समुद्रकिनारी जाळी विनणे, होड्यांच्या डागडूजीसह तेल-पाणी, रंग लावणे, बोर्ड रंगवणे इत्यादी कामे अंतीम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर होडीत जाळींसह डिझेल, बर्फ, अन्न धान्य भरणे, तसेच खलाशांची जमवाजमव इत्यादी तयारी काही मच्छीमारांनी चालविली आहे. सध्या खवळलेल्या समुद्राच्या पाण्याला करंट असल्याने किती नौका निघतील याचे अनुमान लावणे तुर्तास कठीण आहे. तरी, सुरूवातीला नेमक्याच मोठ्या नौका मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाणार असल्याचे कोळीबांधवांकडून सांगण्यात येत आहे.
आराध्याला साकडं
यंदा मच्छिमारीच्या पहिल्या हंगामाला 15 दिवस अगोदर सुरूवात होत असल्याने सुरवातीचा हंगाम चांगला जाईल, असे तालुक्यातील कोळी बांधवांना वाट आहे.त्यामुळे कोळी समाज हा धार्मिक परंपरा जपणारा असुन समुद्रात होड्या लोटण्यापूर्वी आराध्य दैवत मल्हार मार्तंड देवाला कौल लावण्याचा त्यांचा प्रघात आहे. समुद्रात भरपुर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे, अशा मनोभावे आराध्याची प्रार्थना केली जाते. तसेच, होडीची पुजा अर्चा करून होड्या समुद्रात सोडल्या जातात.
मासेमारी बंदी काळात मच्छीमारांनी केलेला खर्च वाया जातो. सरकार आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करते. तशी मच्छीमार बांधवांना देखील आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून मदत करावी.तसेच कोळी बाधवांना त्याचा डिझेल परतावा मिळावा.शेतकऱ्याना ज्या प्रमाणे कर्ज पुरवठा केला जातो तसे कोळी बाधवांना ही केला पाहिजे.
डॉ. कैलास चौलकर
अध्यक्ष
वेस्टकॉस्ट पर्सनियन नेट वेल्फर असोसिएशन महाराष्ट्र रायगड शाखा