शेतकरी लोकोपयोगी सामाजिक संस्था पोलादपूर कार्यालयाचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य शेतकरी नेते चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते संपन्न

शेतकरी लोकोपयोगी सामाजिक संस्था पोलादपूर कार्यालयाचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य शेतकरी नेते चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते संपन्न

सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर (ता. पोलादपूर) – शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने “शेतकरी लोकोपयोगी सामाजिक संस्था पोलादपूर” या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व शेतकरी नेते अध्यक्ष मा. चंद्रकांत विष्णू कळंबे यांच्या हस्ते नुकतेच पोलादपूर शहरात उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांमधून आलेले शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी बोलताना श्री. चंद्रकांत कळंबे यांनी सांगितले, “शेतकरी संघटना ही केवळ संस्था न राहता, एक व्यापक चळवळ बनावी. पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना आर्थिक, सामाजिक आणि शेती क्षेत्रात सशक्त बनवण्याचा आमचा संकल्प आहे. शासनाच्या विविध योजना लाभदायक असल्या तरी त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, आणि ही संस्था त्यासाठी सेतूप्रमाणे काम करेल.”
संस्थेच्या पुढील कार्ययोजनांमध्ये
शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती प्रशिक्षण शिबिरे
कर्जमुक्तीसाठी मार्गदर्शन व सल्ला केंद्र
थेट बाजारपेठेत विक्रीसाठी सुविधा
शेतकरी पतसंस्थेची स्थापना
यांचा समावेश असून, शेतकऱ्यांना सर्वांगीण मदत मिळावी यासाठी संघटनेने कंबर कसली आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष: चंद्रकांत विष्णू कळंबे
कार्याध्यक्ष: पांडुरंग गणपत चव्हाण
सचिव: श्रीराम गायकवाड
खजिनदार: गोविंद पवार
सह खजिनदार: लक्ष्मण गो. चव्हाण
सहसचिव: गजानन सोनवणे
विभागीय अध्यक्ष: महेश मोरे, अभिषेक गरूड ,गणेश मालुसरे, शशिकांत पार्टे, योगेश देवे
सल्लागार मंडळ –
बळिराम दरेकर, विजय मोरे, सतीश शिंदे, दगडू कदम, ज्ञानोबा केसरकर, सिद्धार्थ सकपाळ, सुरेश शिंदे

सदस्य –
सुरेश जाधव, श्याम लाकावडे, संतोष म्हस्के, सागर पवार, वैभव नांदे, अशोक मोरे, शंकर केसरकर

या उपक्रमामुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना नवीन दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. संस्था लवकरच तालुक्यातील सर्व भागांमध्ये कार्य विस्तार करणार असून, शेतकरी हितासाठी नवे उपक्रम सुरू केले जाणार आहेत.