आपत्ती व्यवस्थापनाच्या लाईफ बॉय आणि स्वयंसेवकाच्या तत्परते ने वाचले पर्यटकांचे प्राण
त्रिशा राउत
नागपूर क्राईम रिपोटर
मो.9096817953
उमरेड .मकरढोकळा जलाशयात सोमवार दि. 28 जुलै ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान एक पर्यटक खोल पाण्यात बुडण्याच्या अवस्थेत गेला असताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूरकडून जलाशयावर तैन्यात करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणेमुळे त्याचे प्राण वाचविण्यात यश आले सदर पर्यटक पाण्यात पोहत असता ना अचानक थकवा आणि पाय घसरल्यामुळे खोल भागात गेला त्यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्वयंसेवक स्वप्निल गिलुरकर याने प्रसंगावधान राखत त्वरित लाईफ बॉय फेकून दिलाय हे लाईफ बॉय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांच्याकडून जलाशय परिसरात सुरक्षितच्या दृष्टीने पुरविण्यात आली होती. स्वप्निल गिल्लुरकर, वैभव शिंदे,विकास नारनवरे.न थांबता लगेच त्या पर्यटकाला लाईफ बॉय च्या सहायाने सुरक्षित किनाऱ्यावर आणले त्यांच्या या धाडसी वेळीच दिलेल्या प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेनंतर उपस्थित पर्यटकांनी आणि ग्रामस्थांनी स्वप्नीलच्या धाडसाचे कौतुक करत असे मनःपूर्वक आभार मानले तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेही आभार मानण्यात आले कारण त्यांच्या पुढाकाराने लाईफ बॉय सारखी जीवन रक्षक साधने परिसरात उपलब्ध झाले आहेत मकडढोकळा हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात त्यामुळे अशा सुरक्षा व्यवस्थांचा लाभ होणे ही काळाची गरज आहे
स्थानिक प्रशासन स्वयंसेवकाचा सतर्कते यामुळे कोणती जीवित हानी झाली नाही. हे निश्चितच समाधान बाब आहे