नागाचे आपल्या मानवी समाजावर खुप उपकार आहेत.त्यातुन परतफेड होण्यासाठी आपन नागपंचमी साजरी करतो. धान्याची नासाडी करणारे प्राणी, पक्षी व किटकांची निसर्गातील संख्या नियंत्रित ठेवण्याचे काम साप करतात. महारोग, फुप्फुसाचे रोग यांसारख्या अनेक रोगांत वेदनाशामक व औषधी म्हणून सर्पविषाचा उपयोग होतो. परंतु नागांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत.
सुनील भालेराव, अहिल्यानगर प्रतिनिधी
मो: 9370127037
१) नाग आणि नागीण बदला घेतात का? सत्य काय आहे?
उत्तर – मिलनाचा काळ सोडला तर नाग नागिन कधिच एकत्र येत नाहित, त्यामुळे बदला घेण्याचा प्रश्नच येत नाही. सापाची स्मरणशक्ती विकसित नाही त्यामुळे त्यास स्मरणात राहत नाही.मारलेला साप हे नाग की नागिन हे ओळखता येत नाही कारण नागाचे जनन इंद्रिय हे शरिराच्या आंत असते व निसर्गात नागासारखे दिसणारे धुळनागिन व धामण इ . साप आहेत.
२) अजगर माणसाला गिळते ?
उत्तर – ईतर सापांपेक्षा अजगर हा लांबी रुंदीला मोठा असल्यामुळे हा गैरसमज पसरला असावा,त्याचे खाद्य घुशी , ससे , हरीण -डुकराची पिल्ले , मगरींची पिल्ले हा आहे त्यात मानवाचा समावेश नाही.
नागपंचमीच्या दिवशी सलून का बंद ठेवले जातात?
३) नाग पुंगीवर डोलतो ?
उत्तर – नागाला किंवा सापांना बाह्यकर्ण नसतात,त्यामुळे तो गाणे वा इ.ध्वनी ऐकू शकत नाही. तर तो हलणाऱ्या वस्तूवर हल्ला करण्याच्या पावित्र्यात ती वस्तू हलते तिकडे तो आकर्षित होतो. पुंगीच्या जागी रूमाल किंवा हाताची मूठ धरली तरी नाग तिकडे आकर्षित होतो.सापांत फक्त नाग जातिंचे साप फणा काढतात म्हणून गारुडी नागाचाच खेळ करतात.
४) नाग इच्छाधारी असतात का?
उत्तर – नागाला १०० वर्षे झाली की तो ईच्छाधारी होतो व त्याला केस येतात असा समज आहे ,खरे तर नागच काय तर ईतर सापसुद्धा १००वर्षे जगल्याची उदाहरण नाही. नाग हे फक्त २०-२५ वर्षेच जगू शकतात. तेही एखाद्या सर्पोद्यानातच, कारण निसर्गात सापाचे मुंगूस, घार, गरूड , मोर , ससाणा इ. अनेक शत्रू आहेत.
५) नागमणी म्हणजे नक्की काय असते ?
उत्तर – ही एक दंतकथा आहे. गारुडी काचेचे मणी, पाणी व रक्त शोषणारे दगड किंवा बेंजामिन चे तुकडे नागमणी म्हणून विकतात. जर नागमणी असता तर त्याच्या प्रभावाने हे लोक धनाढ्य झाले असते व आज जगात गारुडी लोकच श्रीमंत राहीले असते.
६) नागाला केस असतात ?
उत्तर – साप हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे त्याच्या अंगावर केस नसतात. गारुडी लोक नागाचे डोक्यावर चाकूने खाच पाडून त्यात कुत्रा शेळीच्या शेपटीची केस रोवतात.
६) नाग दूध पिताना दिसतो ते खरंच असतं का ?
उत्तर – दूध हे सस्तन प्राण्याचे पेयय आहे व साप हा सस्तन नाही . गारुड्यांकडं असणारे नाग हे खूप दिवस आधी पकडून त्यांचे विषारी सूळे काढून त्यांचे तोंड शिवून त्यास अंधार्या खोलीत काहीही खायला न देता ठेवले जाते. लक्षात ठेवा. दूध हे सापाचे पेय नाही , ते पिल्याने सापास आतड्याची रोग होतात. भक्तीपोटी आपण नकळत एका जिवाची हत्या करत असतो. जर असे नाग घेउन कोणी गारुडी घरी आलाच तर तात्काळ जवळच्या वनविभाग वा सर्पमित्रास फोन करा.
७) नागाचा दंश मंत्राने बरा होतो का ?
उत्तर – आपल्याकडील काही मोजके( चार/पाच) साप सोडले तर बहुसंख्य साप बिनविषारी असून त्यांच्या दंशाने इतर प्राण्यास काही होत नाही. दंश झालेली व्यक्ती मानसिक धक्यात असते त्यावर विषाचा प्रभाव नसतो व अशा वेळी मांत्रिकांचे फावते. त्यामुळे नाग दंश झाल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला आणि औषध घ्यावी.
साप वाचवा निसर्ग वाचवा. आपणा सर्वांना नागपंचमीच्या व सर्पदंश जागरुकता दिनाच्या अनंत शुभेच्छा्.
सर्पमित्र, प्राणिमित्र, पक्षीमित्र, मधमाशी मित्र – संदीप प्रकाश खिरे निमगाव शिर्डी – 9689684542