युगपुरुष – अरुण निकम

68

युगपुरुष – अरुण निकम

होते लोक पुण्यवान, 

म्हणुन अनुभवला देव,

याची देही, 

खराखुरा, हाडामांसाचा ,

सहवास लाभला महामानवाचा, 

करतांना सामना, 

जातीयतेच्या उतरंडीचा.!

 

न रुचले स्तोम, कर्मकांडाचे,

न पटले पाखंड, देव अंगात येण्याचे, 

अंगारा, धुपार्‍यांचे, अन नवसाचे, 

वाचविले जीव, निर्दोष बळींचे, 

मोडले कंबरडे, 

दैववादाचे, अंधश्रद्धेचे,

पटविले महत्व, विज्ञानाचे.!

 

पुकारले बंड त्याने, 

अंधकारातून उजेडाकडे,

मार्गस्थ होण्यासाठी, 

उभा ठाकला निर्धाराने, 

मानवी मुल्य, समरसता, 

मानवी हक्क, मिळविण्यासाठी, 

अन अमानवी शृंखलांची परंपरा,

उध्वस्त करण्यासाठी.!

 

तो लढला, भिडला तहहयात,

जटिल परंपरांच्या तटबंदिशी,

मानवी उत्थानाच्या विरोधकांशी, 

पशुहीन ठरवणार्‍यांशी ,

अत्यंत प्रतिकूल वास्तवाशी.!

 

नव्हते कुणाच्या ध्यानी, 

मनी अन स्वप्नांतरी,

घेईल जन्म युगपुरुष कुणीतरी,

करील जातीयतेची,

बिनशिडीची  माडी खिळखिळी, 

अस्ताव्यस्त करील,

वर्णव्यवस्थेची मोळी,

संविधानाच्या माध्यामातून, 

भरून टाकीन सकल,

वंचितांच्या हक्काची झोळी.,!

 

नाव त्या युगपुरुषाचे,

कोटी कोटींच्या उद्धारकाचे,

स्त्रियांच्या प्रगतीची दारे, 

सताड उघडी करणाऱ्याचे, 

संविधानाने समानता, 

प्रस्थापित करणार्‍याचे,

जगातील सर्वात मोठे लिखित, 

संविधान देणार्याचे,

“भारतरत्न डॉ..भिमराव रामजी आंबेडकर.!

 

“भारतरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर.!!

“भारतरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर.!!!

 

अरुण निकम, मुंबई

Mo: 9323249487