स्वामी विवेकानंद बालगृह नागभिड येथे “चित्रकला स्पर्धा” संपन्न

स्वामी विवेकानंद बालगृह नागभिड येथे “चित्रकला स्पर्धा” संपन्न

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही : स्थानिक लोककल्याण बहुद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी व्दारा संचालित “स्वामी विवेकानंद बालगृह”नागभिड येथे अनाथ लेकरांच्या कल्पना शक्तीस वाव मिळावा, यास्तव नेहमीच विविधांगी उपक्रम घेऊन बालकांचं सर्वसमावेशक विकास साधण्याचं यथोचित प्रयत्न केल्या जातो.
: समाज गौरव संस्थापक मा. पुरुषोत्तम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग, बालसंरक्षण कक्ष, बालकल्याण समिती चंद्रपुर यांचे अधिनस्त,गेल्या पंधरा वर्षांपासून सृजनशील व्यक्तित्व या अनाथ बालकांतून घडावेत, यासाठी येथील कर्मचारी अविरत प्रयत्नरत असतात.
: नागपंचमी पर्वाचे औचित्याने याठिकाणी ” मुक्त निसर्गचित्र” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत “करण मंगेश मंगर” या बालकानी आपल्या कल्पनाशक्तीस योग्य न्याय देऊन “प्रथम” क्रमांक पटकाविला. विजेत्यास मा. अधिक्षक नरेंद्र बोरकर सर यांचे हस्ते कलर बाॅक्स व कंपास बाॅक्स देऊन गौरविण्यात आले..
: याप्रसंगी गृहपिता रविंद्र राणे, कर्मचारी सलामे, हिंगाडे, वानखेडे, मालवे व पोर्णिमा श्रीरामे आदिंचे सहकार्य लाभले..