NPCI ने UPI मध्ये १ ऑगस्टपासून केलेले महत्त्वाचे बदल

182

वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने NPCI ने UPI सेवेत काही नवीन बँधने आणि मर्यादा घातल्या आहेत.

बॅलन्स तपासणीवर मर्यादा

दररोज ५० वेळा पेक्षा जास्त बॅलन्स Enquiry करता येणार नाही.

प्रत्येक यशस्वी ट्रँजेक्शन नंतर बॅलन्स ऑटोमॅटिक दिसेल, त्यामुळे वारंवार मॅन्युअल तपासणीची गरज नाही.

लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती API द्वारे

UPI-अ‍ॅपमध्ये लिंक केलेले बँक खात्यांची यादी दररोज २५ वेळां पेक्षा जास्त API कॉलद्वारे मागवू शकत नाही.

प्रत्येक वेळी खात्यांची माहिती मिळविण्यासाठी वापरकर्त्याची स्पष्ट सहमती (explicit consent) अनिवार्य.

नागाला मारल्यास नागीण त्यांचा बदला घेते का? सर्पमित्र काय सांगतात?

Autopay पेमेंटची वेळ आणि मर्यादा

आता Subscriptions, utility बिल, EMI सारख्या Autopay पेमेंट्स फक्त सकाळी १०:०० वाजेपूर्वी किंवा रात्री ९:३० नंतर होणार.

प्रत्येक ऑटोपे आदेशासाठी एकूण ४ प्रयत्न (प्राथमिक + ३ retries) इतकेच होऊ शकतील

Pending ट्रँजेक्शनची स्थिती तपासणे

Pending असलेल्या व्यवहारांची स्टेटस तुम्ही फक्त ३ वेळा विचारू शकता.

प्रत्येक स्टेटस चेकमध्ये किमान ९० सेकंदांचा अंतर असणे गरजेचे.

Beneficiary नावाची स्पष्टता

पैसे पाठवण्यापूर्वी सर्वप्रथम प्राप्तकर्त्याचे नाव मोठ्याक्षणाने दर्शवले जाईल, ज्यामुळे चुका आणि फसवणुक टाळता येईल.

API प्रतिसाद वेळ

मुख्य UPI APIs (transaction initiation, address validation इ.) आता १० सेकंदां आत प्रतिसाद देण्यास बंधनकारक.

वापरकर्त्यांवर होणारा परिणाम

वारंवार बॅलन्स तपासणारे: आता दिवसाला ५० Enquiry पुरेशी. ट्रँजेक्शननंतर बॅलन्स दिसणार, मॅन्युअल वेळ वाचेल.

Autopay वापरकर्ते: पेमेंट वेळात होईल पण non-peak तासांत, काहीवेळा वेळापत्रक अनुकूल करावे लागेल.

Pending व्यवहार तपासणारे: फक्त ३ वेळा स्टेटस मिळेल; काळजीपूर्वक वेळा निवडाव्या लागतील.

सुरक्षाबद्दल जागरूक: beneficiary नाव स्पष्ट दिसल्याने आणि Consent बळकट झाल्याने पेमेंट्स अधिक सुरक्षित होतील.

NPCI ने UPI मध्ये बदल का केले?

ट्रॅफिकचे वाढते ओझे: जून २०२५ मध्ये UPI वर १८.४ अब्ज व्यवहार झाले; सिस्टीमला ताण कमी करण्यासाठी बँधने आवश्यक (ET).

API मिसयूज रोखणे: अनावश्यक API कॉल्स आणि बॉट्समुळे सिस्टम स्लोडाऊन होत होते.

पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविणे: व्यवहारांची विश्वसनीयता वाढेल आणि धोके कमी होतील.