लोढा ग्रुप ने जपली सामाजिक बांधिलकी , प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरीला प्राधान्य

55

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
MO: ९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग पासून जवळच असलेल्या मांडवा येथील लोढा प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन लोढा ग्रुप ने आपली सामाजिक बाधिलकी जपली आहे.त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मांडवा, भाल आणि धोकवडे येथून नोकरीच्या शोधात शहरात गेलेले तरुण पुन्हा अलीबागकडे वळू लागले आहेत. मांडव्यात सुरु असलेल्या लोढा ग्रुपच्या  बांधकाम प्रकल्पात स्थानिक तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या आहेत.

धोकवडे गावचा ऋषिकेश गावंड हा तरुण सध्या लोढा ग्रुपच्या मानव संसाधन (एचआर) विभागात डेप्युटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याने व्यवस्थापनाचाही अभ्यास केला. त्यानंतर तो ठाण्याला नोकरीसाठी गेला. मात्र लोढा प्रोजेक्ट अलीबागमध्ये संधी मिळते हे कळताच त्याने ती लगेच स्वीकारली. या बाबत त्याने आपले मत व्यक्त करताना  “ठाण्यात माझ्याकडे चांगली नोकरी होती, पण सतत घरी जाण्याची ओढ वाटायची. आता मला आवडते कामही करता येते आणि कुटुंबासोबत राहण्याची संधीही मिळते,” असे ऋषिकेशने सांगितले.

तसेच अजय म्हात्रे हे  इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून, त्यांनी आतापर्यंतच्या सगळ्या नोकऱ्या मुंबई आणि नवी मुंबईतच केल्या  होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लोढामध्ये असिस्टंट साइट इंजिनीयर म्हणून जॉईन झाले. “माझ्या आधीच्या कंपनीने मला ३० टक्के अधिक पगार देण्याची ऑफर दिली होती. पण मी आईवडिलांसोबत राहण्यासाठी अलीबाग गाठले. आता मला कामही आवडते आणि प्रवासाचा वेळही फारसा लागत नाही,” असे त्यांनी सांगितले.

सध्या लोढा अलीबाग प्रकल्पात अनेक कर्मचारी आसपासच्या गावांमधून आलेले आहेत. “मुंबईतील एका मोठ्या कंपनीत सात वर्षे काम केल्यानंतर जेव्हा मला माझ्याच गावात लोढामध्ये नोकरी मिळणार असल्याचे कळले, तेव्हा मी फार उत्साही झालो. आता कामही आनंदाने करता येते आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो,” असे जिग्नेश पाटील यांनी सांगितले. ते सध्या लोढामध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पहात आहेत.

पावसाळ्यानंतर लोढा प्रकल्पात अनेक  अभियंत्यां कर्मचारी भरती करणार असून, स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. “आम्ही स्थानिक समुदायाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. अलीबाग प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांचे बायोडेटा मिळावेत म्हणून आम्ही गावांमधील काही प्रमुख व्यक्ती  सोबत संपर्क साधला आहे. प्रकल्पात कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर स्थानिकांना नोकऱ्या देऊन त्यांना स्वतःच्या  पायावर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे लोढा डेव्हलपर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.