डॉ राजेश डहारे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

डॉ राजेश डहारे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील प्राणिशास्त्र विषयांतील प्राध्यापक डॉ राजेश डहारे हे नियत वयोमानानुसार 31 जुलैला सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार शाल, श्रिफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य डॉ सुशील कुंजलवार यांनी केला. याप्रसंगी प्रस्तावना डॉ सिध्दार्थ मदारे यांनी केली त्यामध्ये त्यांनी डॉ राजेश डहारे यांनी केलेले संशोधन, मिळालेली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारीतोषिका विषयी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात दिलेल्या संशोधन लेखाबद्दल माहिती कथन केली तर प्राध्यापक छोटू तूमराम, प्रफुल्ल रनदीवे, अमीत उके, डॉ रीजवान शेख यांनी डॉ राजेश डहारे यांच्या प्राध्यापक व कार्यकारी प्राचार्य काळातील कामाचा स्वानुभव कथन केला. सत्काराला उत्तर देताना डॉ डहारे यांनी त्यांच्या 37 वर्षाच्या सेवेमध्ये केलेल्या कार्याचा उजाळा केला व शिक्षकी पेशात आलेले अनुभव प्राध्यापका समक्ष कथन केले. काॅलेजला प्रगतीपथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली तसेच काॅलेजचे नॅक करतांना आलेले अनुभव कथन केले व असेच प्रयत्न सर्व प्राध्यापकांनी करावे अशी विनंती केली. त्यांनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्या बद्दल आभार मानले. डॉ सुशील कुंजलवार यांनी डॉ राजेश डहारे यांच्या प्रमाणे सर्व प्राध्यापकांनी काॅलेजला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करत रहावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन चेतना अगळे यांनी तर आभारप्रदर्शन अशोक भोसले यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक तुकाराम बोरकर, डॉ विनय त्रिपदे, साहेबराव आळे, सुनील गभने, सुभाष मेश्राम, अर्पना कोवे, नरेंद्र मेश्राम, डॉ रमेश राठोड, अनूश्री लांजेवार, सायली पालकर, जयंत रामटेके, चंद्रलेखा मडके, आकाश बांबोळे, शुभांगी मानकर उपस्थित होते.