माहूर आगारातील एका बस चालकाला बस थांबवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आदित्य खंदारे
माहूर प्रतिनिधी
7350030243
माहूर बस स्थानक आगारातील बसचालक रणजित श्रीराम इंगोले वय 43 वर्ष व्यवसाय नौकरी बसचालक बँच क्र 19749 आगार माहुर रा.माहुर ता.माहुर जि. नांदेड
समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन जबाब संगणकावर टंकलीखीत करून तक्रार दाखल करून घ्या असे माहूर पोलीस स्टेशन येथे सांगितले की, मी मागील सन 2016 या वर्षापासुन बसचालक म्हणुन माहुर आगारात नोकरीस आहे. दिनांक 04/08/2025 रोजी सकाळी 06.00 वाजताचे सुमारास टपाल वाहन बस क्र MH 20 BL 1926 हि बस घेवुन सोबत वाहक के. पी पांचाळ मॅडम वय 52 वर्ष व्यवसाय बस कंडक्टर बँच क्र 20367 व शेख सर्वर शेख कासीम वय 38 वर्ष बँच क्र 17478 असे नांदेड येथुन माहुरला येत असतांना केरोळी फाटा येथे अंदाजे
सकाळी 09.20 वाजताचे सुमारास आलो असता बसच्या समोर टाटा इंडीका कंपनीची कार MH 12 EG
8951 हि रॉंग साईडने येवुन बसच्या दहा फुट समोर रोडच्या साईडला गाडी थांबवुन गाडीतील तिघांनी मला बसच्या खाली ये म्हणाले मी रणजीत श्रीराम इंगोले बसच्या खाली उतरून त्यांना म्हणालो की, “दादा तुमची गाडी थोडी बाजुला घ्या “असे म्हणालो असता त्यांनी मला घाण शिवीगाळ करून तुला माझी गाडी दिसत नाही का असे म्हणाले असता, मी त्यांना “तुमची गाडी राँग साईडला आहे” असे म्हणालो असता त्या तिघांनी मला शिवीगाळ करून थापड बुक्कयांनी
मारहाण केली व त्यातील एकांनी मला त्यांच्या हातातील कड्यांनी माझ्या नाकावर, तोंडावर, गालावर व पाठीत मारहाण केली त्यामुळे माझ्या नाकाच्यावरच्या बाजुने रक्त निघत होते. तेव्हा आमचे बस मधील दोन्ही वाहक के.पी पांचाळ मॅडम व
शेख सर्वर शेख कासीम यांनी मला त्यांच्या पासुन सोडवीले तेंव्हा मी डायल 112 वर कॉल केला असता, पोलिस स्टेशन माहुर येथील अधिकारी व अंमलदार पोलिस जीपसह तेथे आले तोपर्यंत ते तिघे तेथुन त्यांची गाडी घेवुन पळुन गेले होते.
आमच्या गाडीतील कर्मचारी शेख सर्वर शेख कासीम यांनी मला मारहाण झाल्यानंतर त्यां तिघांचे व
त्यांचे गाडी चे फोटो व व्हीडीओ रेकॉर्डींग मोबाईल मध्ये कैद केले आहे. त्यानंतर आम्ही पोलीस अधिकारी व
अंमलदारसह पोलिस स्टेशन माहूर येथे आलो असता त्यांनी मला उपचारसाठी ग्रामीण रुग्णालय माहुर येथे
पाठविले उपचार करून पोलिस स्टेशनला आणले असता, मला व माझ्या सहकार्यांनी त्या व्हिडीओ व फोटो व्दारे त्यातील दोघांचे नाव आम्हाला कळाले ते 1) प्रफुल्ल नारायण राठोड रा. शेकापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड व 2) विवेक गणेश राठोड रा. शेकापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड व एकाचे नाव माहीत नाही. अशाप्रकारे फिर्यादी याने मारहाण करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 अंतर्गत कलम 132, 121(1), 118(1), 115(2), 352, 351(1 ), 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कार्यवाही माहूर चे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी करत आहेत