रांजणखार येथे आरोग्य तपासणी शिबिर
अथर्व फिटनेस व वेलनेस क्लब चे आयोजन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अथर्व फिटनेस व वेलनेस क्लबचे संस्थापक जयवंत कृष्णा पाटील व सौ.दिप्ती जयवंत पाटील यांनी रविवार दिनांक ३ऑगस्ट रोजी रांजणखार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.गावातील ७० ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ दत्तात्रेय पाटील, मधुकर म्हात्रे, गजानन म्हात्रे, बळीराम पाटील , लिलाबाई पाटील, सौ.कांचन म्हात्रे, विनायक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
या वेळी जयवंत पाटील यांनी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बदलत्या जीवनशैलीमुळे बिघडत चाललेले आरोग्य कसे सुधारता येईल याविषयी मार्गदर्शन केले.सध्या अन्न पिकविणे, टिकविणे व शिजवणे याविषयी पूर्वीच्या पद्धती व आताच्या काळातील बदललेल्या पद्धती यातील फरक/बदल समजावून सांगितले.
व्यायाम तसेच सकस,संतुलित, सात्विक व पौष्टिक आहार यांची प्रत्येक व्यक्तीला किती गरज आहे याचे महत्त्व पटवून दिले.
या शिबिरात ७० नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश म्हात्रे यांनी केले.