बाजारपेठांमध्ये राख्यांची दुकाने सजली आहे.

बाजारपेठांमध्ये राख्यांची दुकाने सजली आहे.

१०५ बहिणीनी पोस्टाने भावांना पाठविली राखी

६५सैनिक भावांना बहिणीनी पोस्टाने पाठविली राखी

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचे अतुट नाते असणारा सण म्हणून ओळखला जातो. यंदा रक्षाबंधन शनिवारी (दि.9) आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये राख्यांची दुकाने सजली आहे. राखी खरेदीसाठी बहिणींची लगबग सूरू झाली आहे. राखी खरेदीचा उत्साह वाढला असून, आतापर्यंत 50 टक्केहून अधिक राख्यांची खरेदी झाली असल्याची माहिती विक्रेते दिनेश काराणी यांनी दिली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये राख्यांची दुकाने थाटली आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी दुकाने सजली आहेत. खडा राखी, स्टोन राखी, लटकन, डबी राखी, गोंडा राखी, मोराची राखी, सिव्हर प्लेटेड, स्पायडर मॅन, मोटू पतलू, स्वस्तिक, कासव, मोर, कार्ड घड्याळवाल्या राख्यांसह कासव, मेरे भैया, जय श्रीराम, गणपती, या नावांच्या राख्यादेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राखी खरेदीची लगबगही वाढली आहे. महिला, तरुणी आदींसह अनेकजणांची राखी खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे. यंदा राख्यांच्या किंमती स्थिर असून, काही दुकानांमध्ये जास्त राख्या खरेदी केल्यावर त्यावर सवलत दिली जात आहे. आतापर्यंत 50 टक्के खरेदी झाली आहे. रक्षा बंधन सणाच्या एक दिवस अगोदरही खरेदीसाठी गर्दी होणार असल्याचे दिनेश काराणी यांनी दिली.

शंभरहून अधिक राख्या विदेशात
नोकरी व्यवसायानिमित्त अलिबागमधील अनेकजण विदेशात आहेत. अमेरिकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये ते राहत आहेत. त्यांना रक्षा बंधनाच्या दिवशी प्रत्यक्ष भेटणे काही बहिणींना शक्य होत नाही. त्यामुळे राखी खरेदी करून ते पोस्टाने त्यांना राखी पाठवत असतात. यावर्षी विदेशात असलेल्या भाऊरायांना 105 बहिणींनी राखी पाठविली आहे. पोस्टामार्फत ही राखी पाठविण्यात आल्याची माहिती अधीक्षक थळकर यांनी दिली.
सैनिकांना बहिणींनीकडून राखी
भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. भारतीय सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांना 65 बहिणींनी राख्या टपालाद्वारे पाठविल्या आहेत. गेल्या आठ दिवस अगोदरच या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
ऐन सणासुदीत सर्व्हर डाऊन
बाहेर असलेल्या भावांना राखी पाठविण्यासाठी अलिबागधील पोस्ट कार्यालयात अनेकांची गर्दी होऊ लागली आहे. राखी वेळेवर पोहचावी, म्हणून वेगवेगळ्या पध्दतीने राखी पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलिबागमधील पोस्ट कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने राखी पोस्टाने पाठविण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तासन्तास नागरिकांना रांगेत उभे राहवे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी दिली आहे. पोस्ट कार्यालयातील संगणकामध्ये ही समस्या निर्माण झाल्याने अलिबागमधील पोस्ट शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहीती अधीक्षक यांच्याकडून देण्यात आली आहे. नवीन सॉफ्टवेअरचे काम चालू असल्याने ही समस्या निर्माण झाली होती. आता मात्र सर्व सुरळीत असल्याचे ते म्हणाले.