समता सैनिक दल वर्धा द्वारा दोन दिवसीय निवासी बौद्धिक सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

प्रशांत जगताप प्रतिनिधी
वर्धा:- समता सैनिक दल वर्धा जिल्हा द्वारा शनिवार दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2021 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, महात्मा फुले काँलनी, सावंगी रोड येथे दोन दिवसीय निवासी बौध्दिक सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.23 फेब्रुवारी 2021 ला दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल. या कार्यक्रमाचे ऊदघाटक म्हणून प्रा.डॉ. मिलिंद सवाई,प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा हे उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मार्शल अभय कुभारे जिल्हा संघटक, वर्धा तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. प्रकाश दातार, प्रोग्रामर कमेटी सदस्य महा. राज्य मुकेश गजभिये व्यवस्थापक आणि क्रियान्वयक, महा राज्य मार्शल करण जगदंबे, प्रचारक महा. राज्य मार्शल विवेक बक्शी, विदर्भ बौध्दिक प्रमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील.या सत्राचे सुत्र संचालन प्रा.नारायण मुन तर आभार प्रदर्शन मार्शल अविनाश गायकवाड हे करतील.
यानंतर दुपारी ३ वाजता होणा-या प्रथम सत्रात समता सैनिक दलाचा जाज्वल्य इतिहास 1926 ते 1965 या विषयावर मार्शल विलास नरांजे, महाराष्ट्र प्रवक्ता हे मार्गदर्शन करतील. ‘समता सौनिक दलाचा धगधगता वर्तमान 1965 ते आजपर्यंत’या विषयावर मार्शल कल्पना दातार मँडम महीला विंग महाराष्ट्र राज्य या मार्गदर्शन करतील.या सत्राचे सुत्र संचालन मा. प्रा. नारायन मुन तर आभार प्रदर्शन मार्शल राकेश डंभारे हे करतील.
दि 14 फेबु 2021 वेळ सकाळी 11 ते 1 वाजताच्या पहिल्या सत्रात पुनम ढाले मँडम संघटिका महीला विंग माहाराष्ट्र राज्य. या समता सौनिक दल-त्याग,समर्पण, निष्ठा या विषयावर मार्गदर्शन करतील.तर समता सैनिक दल आणि मी या विषयावर मार्शल संदीप राऊत, थींक टँक महाराष्ट्र राज्य हे मार्गदर्शन करतील. या सत्राचे सुत्र संचालन प्रा. नारायन मुन तर आभार प्रदर्शन मार्शल मनोज थुल हे करतील .
त्यानंतर समारोपीय कार्यक्रम संपन्न होईल. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. अविनाश दिग्विजय,संघटक महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून भास्कर काबळे, बौद्धिक प्रमुख महाराष्ट्र राज्य ,मंगेश तायडे प्रशिक्षक महा.राज्य. मा.गौतम देशभ्रतार, जिल्हा समन्वयक, वर्धा. सुजाताताई वाघमारे, तालुका संघटिका महीला विंग, उषाताई मात्रे शहर संघटिका महिला विंग, मधुर येसनकर, प्रशिक्षक वर्धा, प्रदीप कांबळे, जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख,वर्धा मार्शल हर्षल गजभिये संघटक,पाचोड हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. या दोन दिवसीय बौध्दिक सैनिक प्रशिक्षण शिबिराला वर्धा जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समता सौनिक दल वर्धा जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.