रक्षाबंधन सणाच्या भावना विसरत चालल्या….
संपत्ती च्या वादात 60 टक्के कुटुंबात भावबहिणींच्या नात्यांमध्ये कटुता
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट बंधनाचा उत्सव बहिण भावांमधील अतुट प्रेमाचा सण आता राखी बांधून बहीण व भेटवस्तू देऊन भाऊ आपले कर्तव्य पूर्ण करताना दिसतात. राखीचा पवित्र धागा व त्यामागील भावना लोक विसरत चालले आहेत.
रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा स्नेह व उत्सतान्चे पर्व म्हणून साजरी केला जातो श्रावण महिन्यात येणाऱ्या पोर्णिमेला मोठ्या उत्सहात साजरा होत असतो.या शुभदिनी बहीण भावाला प्रेमाने राखी बांधते व त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवल असते. बहिणी प्रिती असलेल्या कर्तव्यांचे स्मरण करून देत असतो याबाबत अनेक दंत कथाही आहेत. तसेच आजही हा सण मोठ्या भावनेने साजरा करण्याचा प्रयल होतो.
आज काळात रक्षाबंधन या सणाचे महत्व कमी झाले आहे. बहिण भावा मधील अतूट समजले जाणारे प्रेम आटले आहे. पूर्वी बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी सासरहून माहेरी यायच्या व भावाला राखी बांधून माहेरच्या कुटुंबात रमायच्या परंतु आता बहिणी हायटेक झाल्याने किंवा संसाराच्या घराण्यात अडकल्याने वर्षातून येणाऱ्या रक्षाबंधन सणाला भावाला भेटायला न जाता पोस्टाने ,कुरिअरने राखी पाठवून आपले कर्तव्य निभवताना दिसत आहे व दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले आहे.
तसेच महिलांना/मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा दिल्याने अनेक बहिणींनी भावाच्या संपत्तीत आपला वाटा मागितल्याने आज 60 टक्के कुटुंबात भावबहिणींच्या नात्यांमध्ये कटुता आली आहे. त्यामुळे आणि भाऊ व बहिणींनी अबोला धरला मुळे बरेच भाऊ बहिण राखीला मुकले आहेत.
पारंपारिक सणाचे महत्त्व व आताची वस्तुस्थिती पाहता हिंदू संस्कृतीतील सणांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सणा मागची भावनाच लोक विसरत चालले आहेत.