विजेपासून संरक्षण जागरासाठी नागपूर जिल्ह्यात फिरत्या वाहनाद्वारे प्रसिध्दी

विजेपासून संरक्षण जागरासाठी नागपूर जिल्ह्यात फिरत्या वाहनाद्वारे प्रसिध्दी

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953

उमरेड:- .कोसळणाऱ्या विजेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने विजेच्या सुरक्षिततेकरीता आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत व्यापक जनजागृती केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात याबाबत जनजागृती करण्यासाठी उमरेड व रामटेक तालुक्यात फिरत्या वाहनाद्वारे डिजीटल स्क्रीनच्या सहाय्याने परिपूर्ण अशा व्हॅनला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, आपत्ती जिल्हा व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हे वाहन उमरेड तालुक्यातील चानडा, सूरगाव, बेला, मकरधोकडा गावात व रामटेक तालुक्यातील शितलवाडी, नगरधन, भोजापूर, चोखाडा या गावात जनजागृती करेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप खांडे यांनी कळविले आहे.