अलिबाग महसूल सप्ताहात विविध उपक्रम – महसूल दिन साजरा,

अलिबाग महसूल सप्ताहात विविध उपक्रम – महसूल दिन साजरा,

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, आरोग्य व रक्तदान शिबिरे, योजनांचे वाटप व जनजागृती

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मा. महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून अलिबाग तहसील कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आणि तहसीलदार विक्रम पाटील यांच्या समन्वयातून झालेल्या या कार्यक्रमात सन २०२४-२५ मध्ये महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चव्हाण यांनी महसूल विभागाच्या कार्याचे कौतुक करून सर्वांना पुढील कार्यासाठी प्रेरित केले.

महसूल दिनानिमित्त ८६ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला, तर विभागातील २५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महसूल सप्ताहातील उपक्रम
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या सजेतील शासनाच्या रेखीव नियोजनात २०११ पूर्वीपासून राहणाऱ्या कुटुंबांच्या आंतरिक जागांची मोजणी करून पट्टे वाटपाबाबत कार्यवाही केली.

सजेतील पाणंद व शिवाररस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम पार पडला.
ग्रामपंचायत नागाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन सातबारा मोहिम’ अंतर्गत सातबारा वाटप, विविध दाखले वितरण, पीक पाहणी, AgriStack, वाळूवाटप धोरण व विशेष सहाय्य योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी चव्हाण, निवासी नायब तहसीलदार संदिप जाधव, उपअधीक्षक भू-अभिलेख भोलाशंकर कोकणे, ग्रामपंचायत पदाधिकारी व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सर्व ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या सजेतील खातेधारकांच्या घरभेटी घेऊन विशेष सहाय्यक योजनेत डीबीटी न झालेल्यांना मार्गदर्शन करून अनुदानाचे वाटप केले.
अलिबाग तालुक्यातील सर्व RMC प्लांट व क्रशर प्लांट यांना भेट देऊन शासनाच्या ८ एप्रिल व ३० एप्रिल २०२५ च्या धोरणानुसार M-Sand धोरणाची माहिती देण्यात आली व आवश्यक परवान्यांसाठी महाखनिज पोर्टलवर अर्ज करण्याचे सूचनाही देण्यात आल्या. या वेळी तहसीलदार स्वप्नील पाटील, निवडणूक नायब तहसीलदार अजित टोळकर व निवासी नायब तहसीलदार संदिप जाधव उपस्थित होते.

महसूल सप्ताहातील या उपक्रमांमुळे महसूल विभागाचा कार्यक्षेत्रातील विकास, सामाजिक बांधिलकी व जनजागृती या तिन्ही अंगांनी बळकट झाला.