नवी मुंबई मध्ये यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025 पुरस्कार वितरण सोहळा

नवी मुंबई मध्ये यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025 पुरस्कार वितरण सोहळा

नामदार भरत पाटील यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, (भारत सरकार) स्वतंत्र संचालक राज्यमंत्री दर्जा, मिनिस्ट्री ऑफ स्टील पदावर नियुक्तीबदल सत्कार

रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडीक
मो.7722040387

रायगड :- यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई आयोजित यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025 घणसोली, महानगरपालिका सभागृह सेक्टर 7,नवी मुंबई या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळा पार पाडणार आहे. 2018 पासून सलग पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी आठवे वर्ष आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय रत्नाबाई किसन सावंत यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रांत पाटील ( विधान परिषद सदस्य), ज्येष्ठ पत्रकार तसेच महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार तसेच दिनमानचे संपादक विजय चोरमारे, मनोज सानप (ठाणे जिल्हा माहिती अधिकारी) , आर .के बिडवई निरीक्षक धर्मादाय कार्यालय मुंबई, औदुंबर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे पोलीस स्टेशन,रंजना शिंत्रे, मेघना काकडे -माने, चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर ,कविता कचरे, किसन मस्कर ,संजय आंबुळकर ,प्रकाश बोत्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी नामदार भरत पाटील यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकार, स्वतंत्र संचालक राज्यमंत्री दर्जा, मिनिस्ट्री ऑफ स्टील या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. डी. आर जाधव यांची कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे तसेच अधिक डाकवे यांनी सीए परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रातून झुल्फीकार कुरेशी, राजेंद्र धादमे, नंदा डेरे,चित्रा गायकवाड,मेघना सुतार,ब्रिंदा गणत्रा, माधुरी परदेशी,विजय भोसले, हाजी खान, गणेश यादव, महेंद्र जाधव,गीता चापके, उत्तम माटेकर, महेश हुकरे, शोभा चौगुले, अविनाश काटकर, महादेव साळुंखे, ज्योती डुबल, शिवाजी नायकवडी, विशाल नायकवडी, श्रीपती सुतार, वंदना बामणे, अमृत चाळके, कृष्णत सुतार
कुस्ती विभागातून पैलवान तानाजी चवरे
सहकार विभागातुन महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्था उंब्रज
उद्योग विभागातून सुहास सावंत, सर्जेराव माईगडे, प्रिया यादव, सीमा भिलारे ,कीर्ती पोळ, सरस्वती भिलारे ,मेघना सुतार, दशरथ भालेकर, दीपक मोरे
शिक्षण विभागातून प्रतिभा शिवशरण, विजय मोहिते, मीना लेंडे, स्वप्नाली सुर्यवंशी
पत्रकार विभागातून भीमराव धुळप ,आप्पासाहेब मगरे, डी.टी आंबेगावे, दत्ता खंदारे, डॉ पंकेश मधुकर जाधव. शंकर शिंदे, आशा तावडे, उध्दव मामडे, क्रीडा विभागातून विकास बोबडे, शमिका चिपकर,
कला विभागातून जितेंद्र पवार, चंचला बनकर, आयुर्वेदिक सुचिता पावस्कर, सह्याद्रीचा दुर्गवेढा परिवार, नेहा बिराजदार नवी मुंबई पोलीस आदी मान्यवरांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.