जेएसडब्ल्यू फाउंडेशनने ग्रामीण भागातील १५ हजार पेक्षा अधिक कुटुंबांची शेती व उपजीविका सुधारली…

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने ग्रामीण भागातील १५ हजार पेक्षा अधिक कुटुंबांची शेती व उपजीविका सुधारली…

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनची उपक्रम राबवली जाणारी शेती व संबंधित व्यवसायांत सुधारणा ही आजची गरज आहे. जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या गरजेला प्रतिसाद देत १५,००० हून अधिक कुटुंबांना आधुनिक, शाश्वत व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या शेतीपद्धती व उपजीविका वाढीच्या विविध योजनांतून लाभ मिळवून दिला आहे.

विस्तृत क्षेत्रात कामगिरीचा प्रभाव

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने १ जिल्हा, ४ ब्लॉक, ४६ ग्रामपंचायत व १५२ पेक्षा अधिक गावांमध्ये प्रामुख्याने शेती, मत्स्यपालन, पशुपालन, वृक्षारोपण, लघुउद्योग व सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी काम केले आहे. या व्यापक कव्हरेजमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनात दीर्घकालीन बदल घडले आहेत,

मत्स्यपालन क्षेत्रातील उल्लेखनीय काम

मत्स्यपालनाने या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. जेएसडब्ल्यू फाउंडेशनने १६० मत्स्यतळे उभारली आहेत, ज्यांतून दरवर्षी सुमारे ५० टन मासे उत्पादन होतो. यामुळे शेतकऱ्यांना मासेमारीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते, जे त्यांच्या आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण भर टाकते. तसेच स्थानिक पोषणातही सुधारणा होते. याशिवाय, २२ गावकऱ्यांना मत्स्यपालनासाठी आवश्यक किट्स दिल्या गेल्या, ज्यामुळे त्यांनी आपले मत्स्यपालन व्यवसाय उभारला आहे. SMART प्रकल्पांतर्गत एक फिश फीड मिल युनिट उभारून दर्जेदार माशांचा चारा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे माशपालन अधिक प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

लघुउद्योगः आर्थिक स्वावलंबन आणि रोजगार निर्मिती

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने स्थानिक पातळीवर फेनॉल, हँड वॉश, लिक्विड साबण आणि तेल तयार करणाऱ्या लघुउद्योगांचे यशस्वी संचालन केले आहे. दरवर्षी युनिट्सद्वारे सुमारे ३०,००० लिटर उत्पादन होते. या उद्योगांनी विशेषतः महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्यात आर्थिक स्वावलंबनाची भावना वाढवली आहे. तसेच स्थानिक उत्पादनांना चालना मिळत आहे, ज्यामुळे आर्थिक चक्र गावांमध्ये फिरते.

पशुपालनाद्वारे उत्पन्न व खत निर्मिती

जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने ६०० पेक्षा जास्त कोंबडी व शेळी पालन युनिट्स सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कुटुंबांना नियमित उत्पन्न मिळत आहे. पशुपालनातून मिळणारे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पशुपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांची निर्मिती झाली आहे.

वृक्षारोपणः पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक फायदे

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने वृक्षारोपण मोहिमेत १४,१०० बांबू, मोगरा आणि नारळाची लागवड केली आहे. यामुळे पर्यावरणाची सुधारणा होते, जमिनीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक फायदा होतो. शिवाय, २ एकर सूर्यफुलाच्या लागवडीचा प्रकल्प यशस्वी पद्धतीने राबवला जात असून, त्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे आणि पीक विविधीकरणातून उत्पन्न वाढीस चालना मिळाली आहे.

गोदाम व बीज उत्पादनः शेतकऱ्यांना बाजारपेठेत बळकटी

शिर्की येथे जेएसडब्ल्यू फाउंडेशनने उभारलेले गोदाम व तांदूळ संकलन केंद्र यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा दर्जेदार बाजार मिळतो. दरवर्षी येथे ५७ हजार क्विंटल तांदूळ साठवला जातो, ज्यामुळे उत्पादनाची नासाडी कमी होते व शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळते. याशिवाय, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) साठी सुरक्षीत साठवण व्यवस्था सुविधा पुरवण्यात आली आहे, ज्यामुळे ते त्यांच्या उत्पादनांची विक्री अधिक सुलभपणे JSW फाउंडेशनने १७३ शेतकऱ्यांना स्वतःचे तांदळाचे बीज तयार करण्यास प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे दर्जेदार बीजांचा वापर होतो व बाह्य बाजारावर अवलंबित्व कमी होते. करू शकतात.

शेतकरी उत्पादक संस्था (FPO): सामूहिक बळकटी

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने दोन सक्रिय FPOs ची स्थापना केली असून, यामध्ये सध्या २,२६५ हून अधिक शेतकरी सदस्य आहेत. या संघटनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री, बाजारभाव निश्चिती व सामूहिक निर्णय प्रक्रियेत बळ मिळाले आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

आधुनिक शेती पद्धती व पीक विविधीकरण

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने २५ शेतकऱ्यांना पॉलीहाउस शेतीसाठी मदत केली आहे, ज्यामुळे त्यांना पीक सुरक्षीत व उत्पादन वाढवण्याची संधी मिळाली आहे. सुमारे २५० शेतकऱ्यांना SRI/SRT तंत्रज्ञानाने तांदळ लागवडीचे प्रशिक्षण दिले गेले आहे, जे पाण्याची बचत करीत उत्पादन वाढवते. याशिवाय, १२० शेतकऱ्यांनी भाजीपालन व २० शेतकऱ्यांनी मशरूम शेती करून उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडले आहेत.

सेंद्रिय शेतीला चालना

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने ५० शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट बेड्स वाटप केले आहेत, ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते, रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते.

यंत्रसामग्री सहाय्य

शेतकऱ्यांच्या कामात मदत करण्यासाठी ट्रॅक्टर व ट्रॉलीची सुविधा दिली आहे, ज्यामुळे शेतातील कामे अधिक सोपी, वेगळी व कार्यक्षम झाली आहेत.

प्रशिक्षण, प्रदर्शन व सरकारी योजना सहाय्य

शेतकऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण, प्रदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञान अवलंबून उत्पादन वाढवू शकतात. तसेच जेएसडब्ल्यू फाउंडेशन शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि अनुदान मिळवण्यासाठी मार्गदर्शन करते, ज्यामुळे त्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य मिळत आहे.

एक आदर्श ग्रामीण विकास मॉडेल

जेएसडब्ल्यू स्टील, डोलवी मार्फत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या या विविध उपक्रमांनी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे जीवन बदलले आहे. शेतकरी आता केवळ पारंपरिक शेतीपुरता मर्यादित न राहता, विविध शेती व उपजीविका क्षेत्रांमध्ये यशस्वी होत आहेत. सहकार्य, सामूहिक प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य समन्वयाने JSW फाउंडेशनने एक यशस्वी, शाश्वत व सर्वसमावेशक ग्रामीण विकासाचे मॉडेल रचले आहे, जे भविष्यातही ग्रामीण भागात समृद्धी आणि स्थिरता निर्माण करेल.

वैशिष्ट्ये

कृषी महोत्सव \”शेतकरी हितगुज २०२५\” जेएसडब्ल्यू फाउंडेशन डोलवी यांच्यातर्फे आयोजन जेएसडब्ल्यू फाउंडेशन डोलवी व वनराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ फेब्रुवारी रोजी बोरजे गावात \”शेतकरी हितगुज २०२५\” या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील ५५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. महोत्सवाचा प्रमुख उद्देश शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार करणे हा होता.

प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. पोपटराव खांडगळे यांनी एकत्रित पिक व्यवस्थापन, कीड नियंत्रण व पोषण व्यवस्थापन या विषयांवर सखोल माहिती दिली. तसेच, खाऱ्या जमिनीत भाजीपाला मिश्रपीक पद्धतीचे प्रात्यक्षिक प सादर करण्यात आले

या कार्यक्रमास जेएसडब्ल्यू स्टील प्लांटचे वरिष्ठ उपाध्यक्ष कॅ. राजेश कुमार रॉय, डोलवी सीएसआर टीम, तसेच १५ सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. कृषी विभागानेही गाव पातळीवरील शेतीविकासासाठी आपला पाठिंबा दर्शवला.

जेएसडब्ल्यू फाउंडेशनने स्थानिक शेतीसाठी आगामी तीन वर्षांचा सहकार्य आराखडा जाहीर केला, उत्कृष्ट शेती पद्धती अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, सेंद्रिय शेती व कृषी नवकल्पनांवर संवाद व चर्चा घडवून आणण्यासाठी सत्रांचे आयोजन करण्यात आले.

शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांची अभ्यासभेटमध्ये शाश्वत शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी नाशिक (दिंडोरी) येथे शेतकऱ्यांची अभ्यासभेट आयोजित करण्यात आली.‌ या भेटीत शेतकऱ्यांनी कवडसर येथील शेतकरी सुविधा केंद्र पाहिले, जिथे तज्ज्ञ योगेश खैरनार यांनी भात व भाजीपाला लागवड तसेच वॉटरशेड व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी आंबा बाग, भोपळा व ब्रोकोली या आंतरपीकांचे प्रात्यक्षिक, तसेच स्ट्रॉबेरी शेती पाहिली आणि आधुनिक व उत्पन्नवाढीस उपयुक्त अशा पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अभ्यासभेटीतून मिळालेली मूल्यवान शिकवण शेतकरी त्यांच्या शेतात वापरण्याचा मानस बाळगतात, जेणेकरून शाश्वतता आणि उत्पादनक्षमता सुधारता येईल.