चेंडूच्या नादात गमावले दोन मुलांनी जीव

चेंडूच्या नादात गमावले दोन मुलांनी जीव

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो. 8806689909

सिंदेवाही :- सिंदेवाही येथील देवयानी स्कुल मध्ये शिकण्यार्या दोन मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचे घटना एक वाजताचे दरम्यान घडली
सविस्तर वृत्त असे की देवयानी इंटरनॅशनल स्कुल येथील तेरा विद्यार्थी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये फुटबॉल खेळुन विजय आंनद साजरा करुन आनंदोत्सव साजरा करण्यासाठी टेकरी वानेरी नदीवर गेले. तेराही अल्पवयीन विद्यार्थी नदीवरच्या पुलावर क्रिकेट खेळत होते. या त्यानंतर चेंडू नदीत गेल्याने तो आणण्यासाठी तीन मुले नदीत उतरले त्यापाठोपाठ दोन विद्यार्थी सुद्धा उतरले परंतु आयुष दिपक गोपाल( वय 16)व जीत टिकाराम वाकडे(वय17) दोन्ही रा. सिंदेवाही ह्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
सदर संपूर्ण तेरा ही विद्यार्थी हे अल्पवयीन असुन ते देवयानी इंटरनॅशनल स्कुल मध्ये दहाव्या वर्षी वर्गात आहेत शिकत असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच टेकरी वानेरी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांचा शोध घेतला असता दोन विद्यार्थ्यांना नदीतून बाहेर काढले. घटनेची माहिती तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदर संपूर्ण विद्यार्थी अल्पवयीन असुन सुद्धा त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या हातात गाडी देऊन पाच किलोमीटर अंतरावर आंनद साजरा करण्यासाठी कसे जाऊ दिले. असा प्रश्न उपस्थित करीत होते.
संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार कांचन पांडे यानी तात्काळ पोलीस कर्मचारी पाठवून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची चौकशी पोलीस स्टेशन ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बावणे पोलीस सहा उपनिरीक्षक सिंदेवाही हे करीत आहेत.