पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पत्नीला नवऱ्याने पेटवून दिले.

53

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पत्नीला नवऱ्याने पेटवून दिले.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

In a fit of rage, the boyfriend poured petrol on his girlfriend and set her on fire, eventually killing her.

पुणे:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ही घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिला पेटवून दिले. या प्रकरणी पीडिता सुरेखा कसबे या विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून बंडगार्डन पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी हा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. कोणत्या तरुणाशी बोलतेस अशी विचारणा करून तो वाद घालत होता. नेहमी संशय घेत असल्याने त्यांच्यात घटनेच्या दिवशीही वाद झाला. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्याचवेळी आरोपी पतीनेही तिच्या अंगावर जळती कांडी फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या आगीत महिला गंभीररित्या होरपळली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.