रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
अलिबाग म्हसळा,रोहा,माथेरान, माणगाव,पनवेल, पोलादपूर तालुक्यांना तडाखा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यात पावासाने धुमाकूळ घातला आहे. अलिबाग,पेण, म्हसळा,रोहा,माणगाव,पनवेल,
पोलादपूर तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले. सखल भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे, तर हेटवणे धरणातून विसर्ग सुरु असून सहा दरवाजे २०सेंटी मिटर ने उघडले असून धरण पाणी पातळी ८५.१० मीटर आहे.धरणाच्या साडव्या वरून वाहणाऱ्या पाण्याची खोली २०सेंटी मीटर आहे. विसर्ग ११९.५४ घ मी प्रती सेंकद वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भोगेश्वरी नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संपलेल्या २४ तासात ११२.२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रोहा मध्ये सर्वाधीक १६० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. पोलादपूर मध्ये१०६ मिमी,अलिबाग१३५मिमी,माथेरान१४५मिमी, पनवेल मध्ये १३४ मिमी, म्हसळा१४३ मिमी, पेण मध्ये १४२ मिमी, सुमहाड मध्ये ९३ मिमी, खालापूर मध्ये ८५ मिमी, सुधागड ८४मिमी, ,मुरुड४७ मिमी,,माणगाव १४२मिमी, श्रीवर्धन १४०,तला १३४मिमी,पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवसांना रेड अलर्ट जारी केला होता. रविवारी सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात फारसा पाऊस पडला नाही. मात्र संध्याकाळनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरूवात झाली. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, सोमवारी सकाळीही पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पूरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या. अतिवृष्टीमुळे अलिबाग शहरातीच्या सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण परिसर जलमय झाला होता. बोरघर येथील पूरपरिस्थिती ची पाहणी अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी स्वतः जाऊन केली.
पावसाचा जोर वाढल्याने कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा,कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
. पावसाचा जोर कायम राहिला तर सावित्री पातळगंगा नद्यांही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहकन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने केले आहे.