स्वतंत्र दिनाचा उत्साह ; आंबेवाडी येथील M.P.S.S इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ध्वजारोहण सोहळा..

स्वतंत्र दिनाचा उत्साह ; आंबेवाडी येथील M.P.S.S इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ध्वजारोहण सोहळा..

रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडिक
मो. 7722040387

आंबेवाडी येथील M.P.S.S.इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह पालक वर्ग तसेच माझी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. सौ.उन्नती बाईत मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी झेंडा गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.सुप्रिया सकपाळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाबद्दलची निष्ठा व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली महाडिक मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून सर्व शिक्षक वर्गाने सहकार्याने स्वतंत्रदिना चा कार्यक्रम मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पाडला. शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित केले होते .सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी कुमारी. आरुषी पिंपळकर हिने केले.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता सौ.रसिका बामुगडे मॅडम यांनी केली…