चुकीच्या उड्डाणपुलाची कलेक्टर आणि मनपा कमिशनरांच्या समवेत पाहणी.

चुकीच्या उड्डाणपुलाची कलेक्टर आणि मनपा कमिशनरांच्या समवेत पाहणी.

पुनर्रचनेची हमी, नागपूरच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मनपा हद्दीतील उडाण पुलाच्या समस्या घेऊन आमदार डॉ नितीन राऊत यांनी मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी व जिल्हा कलेक्टर विपीन इटणकर यांना प्रत्यक्ष घेऊन चुकाची दुरुस्ती करून देण्यासाठी शांतीनगर उड्डाणपुलासह जरीपटका इटारसी पुलिया, मेकोसाबाग पुलिया, वैशालीनगर दही बाजार पुलिया, राजीव गांधी पुलिया या सर्व ठिकाणी चुकीची लँडिंग व दोषपूर्ण रचना असल्यामुळे अपघातांचे धोके निर्माण झाले असून वाहतुकीचा अराजक माजला आहे.

या सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि डॉ.अभिजीत चौधरी (आयुक्त मनपा) या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून तपशीलवार अहवाल तयार करणार आहे.
पुनर्रचनेची योजना तातडीने राबवण्यात येईल असे आस्वासन मनपा नागपूर वतीने करण्यात आले