‘प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड’ने संजय सावंत यांचा गौरव
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेतर्फे ‘प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड’ देऊन अलिबाग येथे गौरविण्यात आले. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे
राष्ट्रीय सरचिटणीस धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
समाजातील अनियमितता, भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा देत असताना सावंत यांनी माहिती अधिकार या प्रभावी हत्याराद्वारे अनेक सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक बांधिलकी, कार्यतत्परता आणि पारदर्शकतेबद्दलची आस यांचे द्योतक ठरलेले त्यांचे कार्य व्यापक पातळीवर गाजत आहे.
गौरव सोहळ्यावेळी जनतेशी संवाद साधताना संजय सावंत म्हणाले, “माहिती अधिकार कायदा हा नागरिकांच्या हातातील एक सक्षम शस्त्र आहे. प्रशासन व शासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या कायद्याचा सकस वापर करणे आवश्यक आहे. समाजकारण करताना सच्चेपणा आणि धैर्याची जोड असेल तर कोणताही बदल शक्य आहे.”
त्यांनी युवकांना आवाहन केले की, त्यांनी केवळ तक्रारींमध्ये न थांबता प्रश्नांवर अभ्यास करावा व सकारात्मक लढा देऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक प्रशासन प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंत यांच्या या गौरवामुळे अलिबाग परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून त्यांचा हा सत्कार समाजातील इतरांसाठी आदर्शप्रेरणा ठरत आहे.