मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील माणगाव येथील पूल धोकादायक असल्यामुळे वाहतूक कोलाड येथील भिरा फाटा वरून वळविण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील माणगाव येथील पूल धोकादायक असल्यामुळे वाहतूक कोलाड येथील भिरा फाटा वरून वळविण्यात आली आहे.

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- गेली तीन चार दिवस रायगडला पावसाने झोडपले तसेच हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला मंगळवारी देखील रेड अलर्ट दर्शविण्यात आला. तसेच सोमवारी रात्री मंगळवारी पहाटे तुफान पाऊस तर पावसाचा जोर कायम राहिल्याने गेली दोन दिवस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर काही ठीक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता तर मुसळधार पावसामुळे माणगाव येथील कलमजे जवळील पुलावरून पाणी जात असल्याने तसेच गेली तीन चार दिवस सततच्या पावसामुळे त्यावरून पाणी वाहून गेल्याने पुलाला काही थोडेसे तडे गेल्याची माहिती सदरील खात्याला मिळाली असून मार्गावरील वाहतूक कोलाड आंबेवाडी नाका येथील भिरा फाट्यावरून ही माणगाव महाडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.

गेली तीन चार दिवस सततच्या पावसाने रायगडला मोठा तडाखा दिल्याने रोहा तालुक्यातील नद्या नाले मुसळधार पावसामुळे ओसांडून वाहत आहेत तर काही ठिकाणी नद्यांनी नाल्यांनी आपली पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ठीक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी साचले असंख्ये वाहन चालकाना तारेवरची कसरत करून मार्गक्रमण करावे लागत आहे तर मंगळवारी पहाटे धो धो मुसळधार पावसामुळे मार्गावरील माणगाव नजीकच्या कलमजे गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवारी सकाळपासून माणगाव महाड पोलादपूर तसेच तळकोकणात जाणारी वाहतूक वाहतूक यंत्रणा तसेच स्थानिक पोलिस अधिकारी यांच्या वतीने ही कोलाड येथून भिरा फाटा सुतारवाडी, विले व जावठा,निजामपूर मार्गे माणगावकडे वळविण्यात आली आहे.