ठाण्यात अखंड हरिनामाच्या गजरात राष्ट्रसंत सेनाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

217

ठाण्यात अखंड हरिनामाच्या गजरात राष्ट्रसंत सेनाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

प्रतिनिधी : संजय पंडीत 

दि.२०, ठाणे :ठाण्यात वारकरी सांप्रदायतील परिवर्तनवादी विचारसरणीचे क्रांतिकारी राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांचा ७८१ वा पुण्यतिथी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या निमित्ताने ठाण्यातील श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघ ठाणे यांच्या वतीने पुरातन विठ्ठल मंदिरात दि. रविवार १७ ऑगस्ट ते बुधवार दि.२० ऑगस्ट या दरम्यान अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.पुरोगामी नाभिक संघांचे हे ७० वे वर्ष असल्याने या वर्षी शहरातील बहुसंख्य नाभिक बांधवानी आणि सलून व्यवसायिकानी सहभाग घेतल्याने सोहळ्याची भक्तिमय रंगत अधिकच वाढली होती.स्थानिक आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उल्लेखनीय उपास्थितीने देखील सोहळ्याची शोभा यावर्षी अधिकच वाढली.

दरम्यान या सेनाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या अखंड हरीनाम साप्ताहात ठाणे शहरातील नामवंत महिला मंडळाचे सुश्राव्य भजन, वेगवेगळ्या विचारवंतांचे प्रवचन, हरिपाठ आणि नामवंत कीर्तनकार महाराजांच्या कीर्तनाचा समावेश करण्यात आला होता.

या हरीनाम साप्ताहात प्रामुख्याने ह.भ.प. विजय चव्हाण,ह.भ.प. रमेश सागवेकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर शिंदे आदी विचारवंतांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतांना अनमोल आपले विचार मांडले तर ह.भ.प. रामदास महाराज थोरात, ह.भ.प.किशोर महाराज साळुंके, ह.भ.प.विक्रांत महाराज पोंडेकर आदी नामवंत कीर्तनकारांनी राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या वारकरी सांप्रदायतील योगदानावर कीर्तने केली.

दरम्यान या अखंड हरीनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. २० रोजी राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांचा ७८१ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तीभावाने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यात सुरुवातीलाच सेनाजी महाराज यांची प्रतिमा पुजन आणि अभिषेक झाल्यानंतर ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. दादा महाराज जाधव यांनी संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर समाज प्रबोधनात्मक कीर्तन केले.वारकरी सांप्रदयाच्या परंपरेनुसार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाणे या हरीनाम साप्ताहाची आणि सेनाजी महाराज याच्या पुण्यतिथी सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली.

हा अखंड हरीनाम सप्ताह आणि संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचा ७८१ वा पूण्यतिथी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुरोगामी संघांचे जेष्ठ विश्वस्त तथा सल्लागार अशोक राऊत, विठ्ठल दळवी,ज्ञानेश्वर शिंदे,ज्ञानेश्वर राऊत,शांताबाई वाघ,दत्ता जाधव, प्रफुल साळुंके,सुधीर शेलार,शेखर काका भोर,सचिन कुटे,संजय पंडीत तसेच संघांचे अध्यक्ष विजय राऊत,उपाध्यक्ष संतोष राऊत,सचिव प्रशांत तुपे,उपसचिव भुषण वाघ,खजिनदार अशोक पवार,उप खजिनदार अशोक आहेर,कार्यकारी समिती सदस्य प्रकाश वाघ, महादेव शिंदे,रोशन वाघ,महिला सदस्य संगीता महाजन,संगीता जाधव,संगीता सांगळे,लता राऊत, पुष्पा राऊत,वर्षा विश्वासराव यांच्या सोबतच सर्व आजी माजी महिला पदाधिकारी,कार्यकर्त्या तसेच सर्व आजी माजी विभागप्रमुख तसेच संघाच्या सर्वच आजी माजी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.