पोलादपूर तालुक्यात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तीभावात साजरी
सिद्धेश पवार
प्रतिनिधी पोलादपूर तालुका
8482851532
पोलादपूर– नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी पोलादपूर तालुक्यात मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. फणस कोंड, खडकवणे, लोहारमाळ यांसारख्या विविध गावांतील तसेच पोलादपूर तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी एकत्र येत शहरातील श्री विजय पवार यांच्या निवासस्थानी ही पुण्यतिथी साजरी केली.
शहरातील श्री विजय पवार यांच्या निवासस्थानी पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सुस्वर भजन, आणि संगीताच्या माध्यमातून संत सेनेच्या चरित्राचे स्मरण करण्यात आले. भक्तीमय वातावरणात सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष विजय पवार, सर्व पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने नाभिक बांधवांनी उपस्थित राहून संत सेने महाराजांना अभिवादन केले.
संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला. समाजातील एकोप्याचा आणि भक्तीचा आदर्श या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.