All India Radio's Heritage Yatra in Nagpur on 13th February on the occasion of World Radio Day.
All India Radio's Heritage Yatra in Nagpur on 13th February on the occasion of World Radio Day.

जागतिक रेडिओ दिवस निमित्याने 13 फेब्रुवारीला नागपुर मध्ये आकाशवाणीची विरासत यात्रा.

All India Radio's Heritage Yatra in Nagpur on 13th February on the occasion of World Radio Day.
All India Radio’s Heritage Yatra in Nagpur on 13th February on the occasion of World Radio Day.

युवराज मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:– ‘युनेस्को’ ने 2011 मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे 2012 पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली. जागतिक रेडियो दिवसचा अनुसंघाने ऑल इंडिया रेडियोच्या सहयोगाने ऑरेंज ओडिसी नागपुर, नागपुर ‘आकाशवाणी, नागपुरचे हेरिटेज टूर’ आयोजित करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी ला विश्व रेडियो दिवस आहे. ज्या रेडियोच्या क्रांती ने लोकांना एक मनोरंजनाचे एक साधन उपलब्ध करुन दिल. त्यामुळे लाखो करोडो लोकांच्या मनात रेडीयो आणी आकाशवाणी एक नाते निर्माण झाल आहे. विश्व रेडीयो दिवस हा लोकांना शिक्षित करने, माहिती प्रदान करने आणी सांस्कृतिक अभिव्यक्तिच्या स्वतंत्र्याला समोर नेण्या करिता हा दिवस मनवला जाते.

शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 ला 03:15 वाजे पासुन 05:00 वाजे पर्यंत ऑल इंडिया रेडियो, आकाशवाणी, सिविल लाइन्स, नागपुर मध्ये, रेडीयोचे श्रोते, चाहते आकाशवाणी नागपुरचे हेरिटेज भवनचा मध्ये जाऊन रेडीयो आणी आकाशवाणीचा इतिहास, भूमिका आणी रेडियो स्टेशनच्या संदर्भातील कामकाजाची माहिती घेऊ शकतो.

भारतात 1927 मध्ये रेडिओचे प्रसारण सुरू झाले. भारतात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व टपाल खात्याच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट 1921 मध्ये ‘टाइम्स’च्या मुंबईतील इमारतीतून गाण्याचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाल्याची नोंद आहे. गेल्या 93 वर्षांत माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरे आली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. कोणत्य़ाही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून आजही रेडिओकडे पाहिले जाते. अर्थात काळानुसार त्यात बदल झाले. रेडिओची भाषा बदलली. निवेदकांची जागा ‘आरजे’ने घेतली. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here