अलिबाग आगाराच्या शिवशाही बस सतत ब्रेक डाऊन, प्रवाशांचे हाल

अलिबाग आगाराच्या शिवशाही बस सतत ब्रेक डाऊन, प्रवाशांचे हाल

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
८४२०३२५९९३

अलिबाग:– अलिबाग आगाराच्या शिवशाही बसगाड्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिघाडामुळे ठप्प होत असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.आज पुन्हा कार्लेखिंड ते पेझारी दरम्यान अलिबाग आगाराच्या तब्बल दोन शिवशाही बस मार्गातच ब्रेक डाऊन झाल्या.

दरम्यान, काल देखील कार्लेखिंड येथील पेट्रोल पंपाजवळ आणखी एक शिवशाही बस बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. सलग दोन-तीन दिवस बसगाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांच्या मनात संताप व्यक्त होत आहे.

या बिघाडांमुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाया जात असून विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा प्रवाशांत सुरू आहे.

प्रवाशांनी तातडीने योग्य देखभाल करून नियमित व सुरक्षित सेवा सुरू करण्याची मागणी एस.टी. प्रशासनाकडे केली आहे.