Fugitive from Delhi's Tihar Jail 15 years ago, accused with Rs 5,000 bounty arrested in Wardha.
Fugitive from Delhi's Tihar Jail 15 years ago, accused with Rs 5,000 bounty arrested in Wardha.

दिल्लीच्या तिहार जेलमधून 15 वर्षांपूवी फरार, 5 हजाराचे बक्षीस असलेल्या आरोपीस वर्ध्यात अटक.

Fugitive from Delhi's Tihar Jail 15 years ago, accused with Rs 5,000 bounty arrested in Wardha.
Fugitive from Delhi’s Tihar Jail 15 years ago, accused with Rs 5,000 bounty arrested in Wardha.

आशीष अंबादे प्रतिनिधी

वर्धा:- चोरीच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेला दिल्ली येथील तिहार कारागृहातील आरोपी 15 वर्षा पासुन फरार असलेला व 5 हजार रुपये बक्षीस असलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन डीबीजी रोड, दिल्ली येथील गुन्ह्यातील आरोपी धनराज खैरकार याला सन 2004 मध्ये शिक्षा झाली असुन तो सन 2004 पासुन तिहार जेल दिल्ली येथे शिक्षा भोगत होता.

आरोपी सन 2005 पासुन तिहार जेल दिल्ली येथून फरार असल्याबाबत कारागृह अधीक्षक, सेंट्रल जेल, न्यु दिल्ली यांचे कडून पोलीस अधीक्षक, कार्यालय वर्धा येथे पत्र प्राप्त झाले होते. या पत्राचे अनुषंगाने पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांना आरोपी शोध करीता विशेष पथक नेमण्याबाबत निर्देष दिले. ब्राह्मणे यांनी विषेश पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी 28 जून 2008 रोजी स्वतःचे नाव धनराज संतोश खैरकार ऐवजी यश संतोश खैरकार असे बदलून स्वप्नील कळबं अपार्टमेंन्ट प्लॅट नंबर 302 स्नेहलनगर नागपूर येथे वास्तव्यास होता. आरोपीने लेआउट पाडून प्लाट खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

त्यामध्ये त्याने बरेचसे लोकांचे पैसे परत न करता तो भुमिगत होऊन प्लाट खरेदी विक्रीचा व्यवसाय सोडून ड्राय फ्रुट खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तसेच हा सर्व व्यवहार हा आरोपी आनलाईन करीत होता. यश खैरकार हाच धनराज खैरकार आहे, असा संशय बळावल्याने त्याची इतर माहिती काढून शाहनिशा करून तसेच त्याने केलेल्या व्यवहाराचे कागदपत्र पडताळून तिहार जेल येथून मिळालेल्या माहितीवरून यश संतोश खैरकार हाच धनराज संतोश खैरकार आहे हे निष्पन्न झाल्याने आरोपीस नागपूर येथून कायदेशिररित्या ताब्यात घेऊन त्याला तिहार जेल येथे दाखल करण्यातकरिता पोस्टे पुलगाव यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे, पोलिस अंमलदार प्रमोद जांभूळकर, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, अक्षय राऊत, अल्का कुंभलवार तसेच सायबर सेल वर्धा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here