रायगड मधील विद्युत कंत्राटदार आर्थिक संकटात
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनचा काम बंद आंदोलनाचा इशारा
कंत्राटदारांचे पाऊल रोखले, आता काम बंद आंदोलन पेटले
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युत कंत्राटदार ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे करत असून अपुऱ्या बजेट अभावी त्यांना वर्क ऑर्डर मिळत नसल्याने सर्व कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
प्रत्येक डिव्हिजन मध्ये शाखा अभियंता / उपकार्यकारी अभियंता सर्व ठेकेदारांकडून जोर जबरदस्तीने कामे करून घेत आहेत. या कामात बहूसंख्येने ठेकेदारांचे लाखो रुपये गुंतले असून अत्यंत कमी बजेट आल्याने त्यांना पुरेश्या वर्क ऑर्डर मिळत नाहीत म्हणून सर्व ठेकेदारांनी एकत्र येऊन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे महावितरण मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता जीवन पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
जर या बाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर नाईलाजाने काम बंद आंदोलन करावा लागेल असे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
या वेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेश सानप,सचिव भालचंद्र जोशी, खजिनदार शिवराम जंगम, उपाध्यक्ष यदुराम धुमाळ,, दिनेश पाटील,पी. एन. हिरेमठ, गजानन जाधव,महेंद्र चौलकर, गुरु गाताडे,अभिजीत जाधव ,वसंत म्हात्रे, प्रभाकर ठोंबरे, संदीप नागावकर ,तेजस दरेकर, अक्षय डोंबाळे, विकास पाटील,गजानन म्हात्रे व इतर सदस्य उपस्थित होते.
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर च्या मागण्याची पूर्तता करण्या बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून दोन चार दिवसात या मध्ये मार्ग निघेल.
जीवन पवार
सिनियर मॅनेजर
महावितरण मंडळ कार्यालय पेण