पी. के. रोड मराठी शाळा, मुलुंड (प.), मुंबई – दहावी १९९४ बॅचचे द्वितीय स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

55

माजी शिक्षकांचा सन्मान व महाजन सरांचा ७५ वा वाढदिवस सोहळ्याने कार्यक्रम अविस्मरणीय ठरला

मुलुंड, दि. 17 ऑगस्ट: पी. के. रोड मराठी शाळा, सोनार बंगला, मुलुंड (प.) येथे शिकलेल्या दहावी १९९४ बॅचचे द्वितीय स्नेहसंमेलन गोशाळा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे ५० माजी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिका यांची भेट झाली आणि जुन्या आठवणींना नव्या उजेडात उजाळा मिळाला.

शिक्षकांचा सन्मान

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वाती मोरे व अजित कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी दिवंगत शिक्षकांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली गेली.

विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मान केला, तर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मेडल्स देऊन गौरवले.

सुलभा दास टीचर, अशोक महाजन सर, सुरेश चौधरी सर, किसन कुटे सर, सौ. मालवणकर टीचर, सौ. अरुणा शिंगोटे टीचर व सौ. शेरलेकर टीचर यांचा सत्कार झाला. उपस्थित नसतानाही वसंत चोपडे सर यांचे स्मरणरंजन करण्यात आले.

श्री. मिलिंद चन्ने सर व श्री. संतोष सानकरे यांना शिक्षकांचे नंबर मिळवून देण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

विशेष म्हणजे, शाळेच्या १९९२ बॅचच्या सावित्रा थोरात, या सध्या शिक्षिका असून त्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव झाला.

महाजन सर म्हणाले, “३१ वर्षांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला शोधून काढले, ही कौतुकास्पद बाब आहे.”

विशेष आकर्षण

महाजन सरांचा ७५ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

1976 बॅचचे श्री. कुटे सर यांचे माजी विद्यार्थी श्री. एकनाथ चव्हाण यांनी “महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार” कसा मिळाला, याबाबत माहिती देत शिक्षकांचा गौरव केला.

माजी सैनिक जे माजी विद्यार्थी आहे असे भास्कर ठुंबरे यांचे देखील शिक्षकाकडून सन्मान करण्यात आला

महेश जाधव यांनी देशभक्तिपर गीत सादर केले, तर राम थोरात, संजना तावरे, अजित कदम, हेमंत जाधव, महेश गडांकुश आदींनी गाणी गाऊन कार्यक्रम रंगवला.

आयोजन व योगदान

या यशस्वी आयोजनामागे सुधीर पाटकर, भास्कर ठुंबरे, शिवाजी आव्हाड, तानाजी टेमगिरे, महेश गडांकुश, विनोद सकपाळ, अजित कदम, रुपाली मोरे, सीमा कदम, हेमांगी मोरे, सुरेखा गडांकुश यांचे मोलाचे योगदान होते.

सौ. सीमा पोळ यांचे पती श्री. अंकुश पोळ यांनी विशेष सहकार्य केले.

सतीश बनसोडे, अतुल मांजरेकर, दिगंबर शिगवण, निलेश भोळे, प्रशांत बसवंत आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.रेश्मा गावडे यांनी देखील सहभाग नोंदवला एकूण सुमारे ४० विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करून कार्यक्रम संस्मरणीय केला.

या स्नेहसंमेलनात १९९४ बॅचसोबतच १९८८, १९९२, १९९३ व १९९५ च्या बॅचमधील विद्यार्थीही सहभागी झाले.

हा सोहळा म्हणजे केवळ भेटीगाठी नव्हता, तर शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि जुन्या नात्यांना नव्या उजेडात आणणारा हृदयस्पर्शी क्षण ठरला.