“गुरु शॉर्टफिल्म पार्ट १” प्रेक्षकांच्या भेटीला

“गुरु शॉर्टफिल्म पार्ट १” प्रेक्षकांच्या भेटीला

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर

पालघर :- उराडे प्रॉडक्शन प्रस्तुत “गुरु शॉर्टफिल्म पार्ट १” आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतीच उराडे प्रॉडक्शन या अधिकृत YouTube चॅनलवर ही शॉर्टफिल्म प्रदर्शित झाली असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स आणि भावनिक पैलूंचा उत्तम संगम पाहायला मिळतो. फिल्मचे मुख्य कलाकार राहुल सुतार, प्रसाद शिंदे, साक्षी डोंगरे, रोशन रावते आणि महेश उराडे आहेत. कथा, संवाद आणि डायलॉग मनोज उराडे यांनी लिहिले असून, दिग्दर्शन निल साबळे यांनी केले आहे.
निर्मितीची धुरा मनोज उराडे व लोपेश माळी यांनी सांभाळली आहे. तर कॅमेरामन म्हणून प्रथमेश कदम, गीतलेखनासाठी दिलीप काठे सर व रोशन रावते, तसेच गायनासाठी रोशन रावते व संजना रावते यांचे योगदान आहे.
एकूण ४७ कलाकारांच्या सहभागाने तयार झालेली ही शॉर्टफिल्म एका साध्या व शांत जीवन जगणाऱ्या मुलाभोवती फिरते, जो अनपेक्षितपणे गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवतो. कथा प्रेक्षकांना हास्य, थ्रिल आणि भावनिक क्षणांचा अनोखा अनुभव देते.
“गुरु शॉर्टफिल्म पार्ट १” ही प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजनच नव्हे तर विचार करायला लावणारी ठरली आहे.