भिवंडीत संत सेना महाराज जयंती अतिशय उत्सवत साजरी करण्यात आली

भिवंडीत संत सेना महाराज जयंती अतिशय उत्सवत साजरी करण्यात आली

अभिजीत आर.सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी – संत सेना महाराज यांच्या जयंती उत्सवा निमित्त भिवंडीत नाभिक समाज उन्नती मंडळ (रजि.) भिवंडीच्या वतीने शनिवार संध्याकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला गेला. तसेच संस्थेच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाचे ३३ वे वर्ष असून कोंबडपाडा, भिवंडी येथील पार्वती मंगल भवन कार्यालयात पार पडण्यात आला असून सदर कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष मनोहर निकम, दिपक वाघ,किशोर भदाणे, महिला अध्यक्ष शर्मिला निकम, राजश्री हिरे, रुषाली गायकवाड, समाजसेवक अँड.मयुरेश विलास पाटील, मोहित राका आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी
सत्यनारायण महापूजा, त्यानंतर भक्तीगीत गायन, समाजातील मान्यवरांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जेष्ठ नागरिक सत्कार समारोह आणि वह्या वितरण अशा
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर रात्री सर्व समाजबांधवांसाठी महाप्रसाद आयोजित करून कार्यक्रमाची सांगता झाली.