जनता इंग्लिश स्कूल संवत्सर येथे आनंददायी शनिवार.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती
बनविणे कार्यशाळा उत्साहात संपन्न.
दैनिक मीडिया वार्ता.
सुनील भालेराव.
अहिल्यानगर: पोहेगाव. 9370127037.
दि.26/8/2025.
संवत्सर: कोपरगाव तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल मध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणपती मूर्ती कार्यशाळा व प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
गुरूवार दि.21 रोजी विद्यालयात भव्य स्वरूपात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत पर्यवेक्षक श्री.जेजुरकर सर यांनी प्रत्यक्ष दिग्दर्शनाद्वारे पर्यावरणपूरक गणपती मूर्तीचे महत्त्व अधोरेखित करत स्वतः गणपती मूर्ती बनवून व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सखोल व बारकाईने मार्गदर्शन करुन व प्रेरणा देऊन शाडू मातीच्या सुबक व आकर्षक गणपती मूर्ती तयार करुन घेतल्या.
विद्यार्थ्यांनीही आपल्यातील कला व सृजनशीलतेचा वापर करून कार्यशाळेत 122 गणपती मूर्ती तयार केल्या.त्यानंतर शनिवार दि.23 रोजी विद्यार्थ्यांनी सुबक रीतीने तयार केलेल्या या गणपती मूर्तींचे भव्य स्वरूपात प्रदर्शन भरविण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर.एस.सर यांनी आपल्या मनोगतात पर्यवेक्षक श्री.जेजुरकर सर व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्य व नवनिर्मितीच्या गुणांचे व कार्यशाळा घेवून प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केले.
विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री.जेजुरकर व्ही.के.व श्री.सुरजुसे सर यांनी कार्यशाळेचे अत्यंत उठावदार रीतीने नियोजन करून आयोजन केले.
कार्यशाळा व प्रदर्शनाप्रसंगी गणपती मूर्ती बनवणारे चिमुकले विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.