यशोधराजी बजाज यांचा पंधरावा स्मृती दिन संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 27 ऑगस्ट
सर्वोदय महिला मंडळाच्या संस्थापिका महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री, दलित मित्र, साहित्य रत्न यशोधराजी बजाज यांच्या १५ व्या स्मृती दिना निमित्य बुधवार २० ऑगष्ट रोजी दुपारी सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या प्रांगणात पुष्पांजली चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा सर्वोदय महिला मंडळाच्या सचिव ममता बजाज यांच्या शुभहस्ते यशोधराजी बजाज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचा अनेक सदस्यानी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेच्या सचिव ममता बजाज यांनी आपल्या भाषणातून यशोधराजी बजाज यांच्या सामाजिक, राजकीय, व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला. यशोधराजी बजाज यांचे
कार्य संस्थेला सदैव प्रेरणादायी राहील व त्यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने संस्था यापुढेही निरंतर यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला श्यामजी बजाज, संस्थेच्या सदस्या डॉ. अनुराधा सालफळे, सुश्री. अनुराधा ढोक, बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ मनोज बसेशंकर , सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित यशोधराजी बजाज फार्मसी कॉलेज , कमलादेवी बि.एड कॉलेज , नूतन माध्यमिक विद्यालय, नूतन प्राथमिक विद्यालय, हिंदी माध्यमिक विद्यालय, इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, क्रांती हिंदी प्राथमिक विद्यालय, बजाज विद्या भवन, यशोधरा बजाज आश्रम शाळा गीलबिली आणि कर्मवीर कन्नमवार आयटीआय या सर्व शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापिका व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पि. एम. सिंग .यांनी केले.