सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर : 27 ऑगस्ट
कर्मवीर मा सां कन्नमवार शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात अवयवदान पंधरवाडा निमित्ताने आयोजित रांगोळी, पोस्टर्स व निबंध स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पुरस्कार पटकावीत यश संपादन केले.

कर्मवीर मा सां कन्नमवार शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे नुकताच अवयवदान पंधरवडा साजरा करण्याच्या अनुषंगाने निबंध, रांगोळी, पोस्टर्स अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यात रांगोळी स्पर्धेत ज्ञानेश्वरी काळे हिने प्रथम तर शुभांगी वाबहिरकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत विशाल निकोडे, तर
पोस्टर्स स्पर्धेत उत्कर्ष बारापात्रे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्यासह उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.अजय बेले यांच्यासह समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी या यशाबद्धल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.