भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम : इंदिरानगरात वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य पर्यावरणपूरक प्रतिकृती

भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम : इंदिरानगरात वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य पर्यावरणपूरक प्रतिकृती

ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक: भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळाने यावर्षीही ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक जिवंत देखावे साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा इंदिरानगर येथील वडाळा–पाथर्डी रोडलगत वृंदावन मथुरातील प्रेम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

ही प्रतिकृती ८० फूट उंच व ६० फूट लांब असून ४० फूट उंच आकर्षक महाप्रवेशद्वार आहे तसेच हा देखावा संपूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. जसे की बांबू, बल्ली, बॉटम पट्टी व कपड्यांचा वापर करून साकारण्यात आला आहे. देखावा भाविकांसाठी पहिल्याच दिवसापासून खुला करण्यात आला असून भाविक दर्शनासाठी अफाट गर्दी करत आहेत.

या ठिकाणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही भेट दिली तसेच भाजपा पदाधिकारी, संत-महंत, नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून दर्शन घेतले. भाविकांनी रांगा लावून श्रीकृष्णाच्या विविध रूपातील दर्शनाचा आनंद घेतला.

स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ देण्यात आले असून सर्वधर्मसमभावाच्या वातावरणात विविध धर्मीय कलाकार पारंपरिक नृत्य, गायन व कला सादर करत आहेत. यंदाचे वृंदावन प्रेम मंदिराचे दर्शन हे नाशिककरांसाठी खास आकर्षण ठरत असून, मथुरेला प्रत्यक्ष जाता न येणाऱ्या नागरिकांना येथे समाधान मिळत आहे. गेल्या वर्षी मंडळाने खंडोबा जेजुरी गडाची प्रतिकृती उभारली होती. त्या देखाव्यास शासनासह अनेक संस्थांनी पारितोषिके प्रदान केली होती.

ह्या देखाव्याला यशस्वी करण्यासाठी
मंडळाचे संस्थापक भाजपा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, उत्सव अध्यक्ष जयंत टक्के, कार्याध्यक्ष गोपाल आव्हाड, उत्सव प्रमुख ॲड. मनीष पाटील, सचिव आशिष दाभोलकर, खजिनदार भरत शिरसाठ, संघटक परेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख गणेश रत्नपारखी यांच्यासह महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.

 

चौकट

यापूर्वीही या मंडळाने ऐतिहासिक देखावे सादर केले आहे यात राम मंदिर, १०८ फूट उंच शिवलिंगाचे महामृत्युंजय मंदिर, बारा ज्योतिर्लिंग, संत परंपरेचे दर्शन यांसारखे अनेक भव्य पौराणिक धार्मिक देखावे साकारले गेले आहेत.

 

चौकट

धार्मिक-सामाजिक उपक्रम
गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अंतर्गत मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात रक्त, लघवी, ईसीजी तपासणी, आवश्यक शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. याशिवाय दररोज रक्तदान, अवयवदान शिबिर, व्यसनमुक्तीवरील नाटिका, मुलींसाठी संरक्षण प्रात्यक्षिके, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.