पाष्टी कुणबी गावाने घेतला ऐतिहासिक निर्णय… हळदी समारंभ व ईतर कार्यक्रमात दारू बंदी.

2939

पाष्टी कुणबी गावाने घेतला ऐतिहासिक निर्णय… हळदी समारंभ व ईतर कार्यक्रमात दारू बंदी.

म्हसळा तालुका: संतोष उध्दरकर

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील मौजे पाष्टी कुणबी गाव मधील आज झालेल्या बैठकीत हळदी समारंभ, तसेच ईतर कार्यक्रमात दारु बंदी करण्यात आली असून हा ठराव सर्वानुमते मंजूर करून या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. कोणत्याही ठिकाणी हळद, लग्न समारंभ म्हटले कि दारू हा विषय प्रामुख्याने येतो, यामुळे समोरील यजमान यांना अधिक आर्थिक भूदंड सोसावा लागतो, तसेच दारु मुळे शुभ कार्यात कलह वाढून वाद विवाद होण्याचे प्रकार घडले असल्याने गावाच्या हिताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला असे गावचे प्रतिष्ठित नागरिक व समाजिक कार्यकर्ते मंगेश मुंडे यांनी सांगितले. आम्ही जो सर्वानुमते दारु बंदी चा निर्णय घेतला आहे तो खरच लोक हिताचा आहे, आणि यापुढे या तरुण पिढीने देखील या निर्णयाची अमंलबजावणी केली पाहिजे, तसेच आम्ही जो निर्णय घेतला आहे तो ईतर गावांनी देखील घ्यावा जेणेकरून कुणीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही असे सभेचे अध्यक्ष रामचंद्र गिजे यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सांगितले.सभेत अनेक विषयावर चर्चा करून गावचा विकास, रोजगार, शेती या विषयावर भर देऊन गाव सुजलाम सुफलाम व व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी उपस्थित सभा अध्यक्ष रामचंद्र गिजे, मुंबई कमिटी अध्यक्ष अनंत दिवाळे, मंडळ अध्यक्ष प्रदीप मुंडे, समाज सेवक मंगेश मुंडे,ग्रामीण कमिटी अध्यक्ष संतोष मुंडे. तसेच लहान मुले, तरुण मुल, मुली, महिला, अबालवृद्ध उपस्थित होते.