कळमेश्वर येथे तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीची वार्षिक सभा संपन्न.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय झालेल्या सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार
Annual meeting of Taluka Cooperative Agricultural Purchase and Sale Committee held at Kalmeshwar
युवराज मेश्राम प्रतिनिधी
कळमेश्वर:- कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड मध्ये आज तालुका सहकारी शेती खरेदी विक्री समितीची वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेला प्रामुख्याने या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सुनील बाबू केदार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबा पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबा कोडे अध्यक्ष खरेदी विक्री समिती कळमेश्वर हे होते.
याप्रसंगी सुनील बाबू केदार यांनी कॅनडा मधील शेळी 12 लिटर दूध देणारी महाराष्ट्रात आणून दुग्धव्यवसायात भर पाडण्यासाठी शेतकऱ्यांना शेळीपालन म्हणून दुग्ध व्यवसाय याकरिता जोडधंदा म्हणून येथील शेळी आणण्याचा प्रयत्न करून राज्यात मोठा दुग्धव्यवसाय करण्याचे काम दुग्ध मंत्री यांनी केले तत्पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वाराचे उद्घाटन मंत्री महोदय सुनील बाबू केदार यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रावण दादा भिंगारे सभापती पंचायत समिती कळमेश्वर वैभव घोंगे माजी सभापती पंचायत समिती कळमेश्वर नरेंद्र पालकर माजी उपसभापती पंचायत समिती कळमेश्वर जयश्री वाडके उपसभापती पंचायत समिती परमेश्वर अशोक भागवत तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी अविनाश गोतमारे महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस संजय पाटील ठाकरे किशोर मोहोळ अरविंद रामावत शंकरराव देशमुख विरेंद्र सिंग पाटील महेंद्र डोंगरे सदस्य जिल्हा परिषद विभा निंबाळकर राजेंद्र जिचकार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय झालेल्या सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार सुनील बाबू केदार व मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.