सिंदेवाही येथे शांतता बैठक संपन्न

20

सिंदेवाही येथे शांतता बैठक संपन्न
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909 :-

सिंदेवाही :- दिनांक 01/09/2025 चे 11/30 ते 13/30 वाजता दरम्यान श्री गणेशोत्सव 2025 व ईद-ए-मिलाद सणानिमित्त पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून तुलसी मंगल कार्यालय सिंदेवाही येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. माननीय राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांचे अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक सिंदेवाही माननीय तहसीलदार संदीप परमानंद व सिंदेवाही शहर नगराध्यक्ष भास्कर ननावरे कनिष्ठ अभियंता रामटेके साहेब व सिंदेवाही नगर पंचायत चे अधिकारी,कांचन. प. पांडे ठाणेदार पोलीस स्टेशन सिंदेवाही,सार्वजनिक बांधकाम विभाग , इत्यादी शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते तसेच शांतता समिती चे सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, ईद-ए-मिलाद कमिटीचे सदस्य ,पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक , गणेश मंडळाचे पदाधिकारी , डीजे मालक असे अंदाजे 450 ते 500 जनसमुदाय उपस्थित होते.